BREAKING : VIDEO : नांदगाव चेकपोस्टवर पोलिसांवर हल्ला..२५ ते ३० लोकांच्या जमावाची मारहाण

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 11 May 2020

चाळीसगाव- नांदगाव सीमेवर चेकपोस्टवर बंदोबस्त करणाऱ्या पोलीस पथकावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचे कारण नातेवाईकांची गाडी जाऊ दिली नाही म्हणून संबंधित व्यक्तीने गावातून टोळी बोलावून पोलीस पथकावर हल्ला चढविला

नाशिक : चाळीसगाव- नांदगाव सीमेवर चेकपोस्टवर बंदोबस्त करणाऱ्या पोलीस पथकावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचे कारण नातेवाईकांची गाडी जाऊ दिली नाही म्हणून संबंधित व्यक्तीने गावातून टोळी बोलावून पोलीस पथकावर हल्ला चढविला. या हल्ल्यात नांदगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्या डोळ्याला मार लागल्याचे देखील समजते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडली तसेच खुर्च्यांचीही तोडफोड झाल्याची माहीती मिळत आहे.नांदगाव चाळीसगाव चेक पोस्ट वर २५ ते ३० लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. या हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

 

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mob of 25 to 30 people attacked the police at Nandgaon check post nashik marathi news