गावच्या भावी कारभाऱ्यांची तहसीलबाहेर यात्रा; अखेरच्या दिवशी १० हजारांवर इच्छुकांचे अर्ज

more than 10 thousand applications filed for Gram Panchayat on last day nashik marathi news
more than 10 thousand applications filed for Gram Panchayat on last day nashik marathi news
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवार (ता. ३०)चा अखेरचा दिवस असल्याने दोन दिवसांपासून सर्व्हर डाउनमुळे त्रस्त असलेल्या गावोगावच्या भावी कारभाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात जणू यात्रा भरली होती. अखेरच्या दिवशी तब्बल दहा हजार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची संख्या १५ हजार १८ इतकी झाली आहे. 

उमेदवार आणि त्यांचे समर्थक सगळ्यांनाच प्रतीक्षा करावी लागत असल्याने जागोजागी बैठकांचे फडही रंगले होते. सर्व्हर डाउनमुळे बुधवारी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. सायंकाळी साडेपाचची वेळ असली, तरी प्रचंड गर्दीमुळे उशिरापर्यंत इच्छुक रांगेत होते. त्यामुळे अखेरचा अर्ज दाखल होण्यासाठी उशिरापर्यंत कार्यालये गजबजलेली होती. जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींमध्ये ही रंगत आहे. त्यात, तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींत प्रस्थापितांविरोधात तरुणांनी दंड थोपटल्याने चुरशीच्या लढती होत आहेत. ६२१ ग्रामपंचायतींसाठी १५ हजार १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

तालुका ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज 

नाशिक २५ १,०५० 
त्र्यंबकेश्वर ०३ ५० 
दिंडोरी ६० १,३१७ 
इगतपुरी ०८ १४७ 
निफाड ६५ १,७१७ 
सिन्नर १०० २,२७५ 
येवला ६९ १,७८६ 
मालेगाव ९९ १,९८० 
नांदगाव ५९ १,४६७ 
चांदवड ५३ १,१४७ 
कळवण २९ ६०७ 
बागलाण ४० १,१३५ 
देवळा ११ ३४० 
एकूण ६२१ १२,८८० 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com