
नाशिक : हिवाळ्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दुप्पट होण्याची भिती निर्माण झाल्याने कोव्हीड सेंटर म्हणून मान्यता दिलेल्या रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांतील कोव्हीड बेड ची संख्या कमी करण्यात आलेली नाही. परिणामी सध्या शहरात ९० टक्क्यांहून अधिक कोव्हीड बेड रुग्णालयांमध्ये रिकामे झाले असून कोव्हीड सेंटर साठी ऑगष्ट महिन्यात प्रयत्न करणारे रुग्णालयांवर आता मान्यता रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची वेळ आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात कोरोना उतरणीला
कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण एप्रिल महिन्यात नाशिक शहरात आढळला त्यानंतर कोरोना वाढीचा आलेख कायम उंचावत राहिला. आता पर्यंत ६९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एप्रिल ते जुन महिन्यात २०८०, जुलै महिन्यात ७,३३१, ऑगष्ट महिन्यात १६,०४०, सप्टेंबर महिन्यात २६,०२१, ऑक्टोंबर महिन्यात १०,५०४, नोव्हेंबर महिन्यात ४,७३८ तर बारा डिसेंबर पर्यंत २,३७७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जुन महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली. त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड राखिव ठेवण्याच्या सुचना दिल्या. ऑक्टोंबर महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठल्याने खासगी रुग्णालये देखील फुल्ल झाली होती. परंतू नोव्हेंबर महिन्यात कोरोना उतरणीला लागल्याने रिक्त बेडची संख्या देखील वाढली. कोरोनाची दुसरी लाट हिवाळ्यात येणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याने रिक्त बेड अद्यापरी राखिव आहेत. कोरोनासाठी राखिव असलेल्या बेडवर अन्य रुग्णांना दाखल करता येत नसल्याने रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोव्हीड सेंटरची मान्यता रद्द करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्यात आले आहेत.
अशी आहे रुग्णालयातील बेडची स्थिती (कंसात रिक्त बेड)
- कोव्हीड सेंटर म्हणून जाहीर झालेले रुग्णालय- ९१
- एकुण राखिव बेड- ४,५६१ (३८१४)
- ऑक्सिजन बेड- २,५०१ (२,१७०)
- आयसीयु बेड- ५०३ (३७५)
- व्हेंटीलेटर बेड- २५९ (२०४)
- खासगी रुग्णालयांमधील बेड- १९१५ (१६०८)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.