कर्जाच्या बदल्यात गहाण ठेवलेले दागिनेच निघाले बनावट; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

विनोद बेदरकर
Wednesday, 13 January 2021

सव्वातीन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तितक्याच किमतीचे गहाण म्हणून ठेवलेले दागिने बनावट निघाल्याने न्यायालयाच्या आदेशाने संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काय घडले नेमके?

नाशिक : सव्वातीन लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तितक्याच किमतीचे गहाण म्हणून ठेवलेले दागिने बनावट निघाल्याने न्यायालयाच्या आदेशाने संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काय घडले नेमके?

गहाण ठेवलेले दागिनेच निघाले बनावट 

अंकुश जळगावकर (रा. पौर्णिमा स्टॉपजवळ) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी नरेश शाह (रा. गंजमाळ) यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार, ५ मे २०२० ला संशयित अंकुश जळगावकर याने सहा अंगठ्या, पाटली, ब्रेस्लेट, नेकलेस, दोन वेल, चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवून शाह यांच्याकडून तीन लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसानंतर शाह यांनी संशयिताकडे मुद्दल व व्याजाची मागणी केली असता, त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शाह यांनी २५ जुलैला दागिने विक्रीसाठी सराफाकडे नेले असता, दागिने सोन्याचे नसल्याचे समजले.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शाह यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तेथे अदाखलपात्र गुनह्याची नोंद झाली. त्यामुळे शाह यांनी न्यायालयात अर्ज दिला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सोमवारी (ता. ११) संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mortgaged jewelry fake nashik crime marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: