ह्रदयद्रावक! "अखेर आज माझी लेकरं मला मिळाली.." संघर्षाला यश अन् मातेच्या कुशीत विसावली लेकरं ...

विनोद बेदरकर
Thursday, 6 August 2020

पतीच्या आत्महत्येनंतर त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा ताबा त्यांच्या चुलत  सासू  योगिता झोले यांनी घेतला मूल ताब्यात मिळावी म्हणून त्यांनी हर प्रकारे प्रयत्न केले. घरगुती वाद म्हणून अनेकांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले.

नाशिक :  पतीच्या आत्महत्येनंतर त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा ताबा त्यांच्या चुलत सासू  योगिता झोले यांनी घेतला मूल ताब्यात मिळावी म्हणून त्यांनी हर प्रकारे प्रयत्न केले. घरगुती वाद म्हणून अनेकांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर मुलांशी कायमचा संपर्क तुटून एकट्या जीवन जगण्याची वेळ यशोदावर आली होती. पण त्यानंतर अखेर देव धावून आलाच..

मुलांचा ताबा मिळण्यासाठी मातेचे प्रयत्न

त्र्यंबकेश्‍वर येथील गंगाद्वार भागात राहणाऱ्या यशोदा झोले यांच्या पतीचे मार्च २०१९ मध्ये निधन झाले. पतीच्या आत्महत्येनंतर त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा ताबा त्यांच्या चुलत सासू  योगिता झोले यांनी घेतला मूल ताब्यात मिळावी म्हणून त्यांनी हर प्रकारे प्रयत्न केले. घरगुती वाद म्हणून अनेकांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर मुलांशी कायमचा संपर्क तुटून एकट्या जीवन जगण्याची वेळ आलेल्या यशोधा झोले यांनी  त्र्यंबकेश्वर भागातील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांच्याकडे तक्रार केली.

विषय मानव हक्क संघटनेच्या दरबारात

श्रीमती शिंदे यांनी हा विषय त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात नेला पोलीस निरीक्षकांनी मुलांचे व दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन करून मुलांची समजूत काढली पण त्यात यश आले नाही. परिणामी हा विषय मानव हक्क संघटनेच्या दरबारात गेला. तेथील मानवाधिकार संघटेचे अध्यक्ष कार्तिक शास्त्री यांनी  त्र्यंबकेश्वराला भेट देऊन झोले कुटुंबाचे समुपदेशन केले. मात्र तेथेही मूल ताब्यात मिळालीच नाही. 

न्यायालयात दरवाजे ठोठवावे लागले 

अखेर मानव हक्क संघटनेने हा विषय थेट बाल कल्याण समितीकडे नेला बाल कल्याण समितीकडे समुपदेशन होऊन अक्षदा आणि हर्षद ही दोन्ही मूल मंगळवारी सायंकाळी त्यांच्या आई यशोदा झोले यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला. अखेर ही दोन्ही मूल चार महिण्याच्या अथक संघर्षानंतर यशोधा झोले यांच्या कुशीत विसावली. आणि चार महिन्यापासून   सुरु असलेल्या एका मातेच्या संघर्षाला यश आले. पोटच्या  लेकरं त्यांच्या ताबा मिळविण्यासाठी जन्मदात्या आईला  पोलीस स्टेशन ,मग न्यायालयात दरवाजे ठोठावावे लागले, रडून रडून तिचे अश्रू संपायची वेळ आली पण अखेर तिची लेकरं तिला मिळाली.

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

महिलेची दोन मूल त्यांच्या ताब्यात
पोटच्या अल्पवयीन मुलांचा ताबा मिळविण्यासाठी चार महिन्यापासून दारोदार पायपीट करीत उंबरठे झिजवणाऱ्या श्रीमती यशोदा प्रसाद झोले या महिलेच्या संघर्षाला बाल कल्याण समितीच्या दारात अखेर यश आले. बाल कल्याण समितीने महिलेची दोन मूल त्यांच्या ताब्यात दिले. सामाजिक कार्यकर्त्या त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाणे, मानव हक्क कार्यकर्ते आणि आता बाल कल्याण समिती असा सगळा संघर्ष फळाला आला आणि दोन्ही मूल यशोदा यांच्या कुशीत विसावली.

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

आयुष्याला आधार मिळाला

चार महिन्यापासून अविरत प्रयत्न करीत होती. अखेर आज माझी लेकरं मला मिळाली.पतीच्या निधनानंतरच्या  माझ्या विरान आयुष्याला आधार मिळाला.- यशोधा झोले (मुलांची आई)

मूलांना त्यांच्या आईपासून वेगळे करण्याच्या या विषयाला सर्वप्रथम सकाळने वाचा फोडली. आज मातेच्या कुशीत ही लेकरं विसावली याचे श्रेय सकाळच्या प्रयत्नांमुळे प्रयत्नांना यशोधा यांच्या प्रयत्नांना यश आले. -ललिता शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या  त्र्यंबकेश्‍वर)

रिपोर्ट - विनोद बेदरकर

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother's struggle was successful nashik marathi news