शिक्षकेतर कर्मचा-यांचे लेखणीबंद आंदोलन; विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून आंदोलनास सुरुवात

दत्ता जाधव
Friday, 25 September 2020

विभागातील सर्व अनुदानित महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या महाविद्यालयात गुरुवारपासून आंदोलनास सुरवात केली आहे. आंदोलनात शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, त्यामुळे सर्व महाविद्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. 

नाशिक : राज्यातील अकृषी विद्यापीठे व व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने गुरुवार (ता.२४)पासून लेखणी/अवजार बंदसह ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. आंदोलनाची पुढची पायरी म्हणून १ ऑक्टोबरपासून सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयीन कामबंद आंदोलन केले जाणार आहे. 

महाविद्यालयांचे कामकाज ठप्प
विभागातील सर्व अनुदानित महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या महाविद्यालयात गुरुवारपासून आंदोलनास सुरवात केली आहे. आंदोलनात शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, त्यामुळे सर्व महाविद्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

आंदोलनाकर्त्यांच्या मागण्या 
- १२ व २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजना पूर्वीप्रमाणे त्वरित लागू करण्यात यावी 
- आश्वासित प्रगती योजना रद्द करण्यासंदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा 
- १२ व २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन त्वरित सुरू करावे 
- सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्वरित वेतनश्रेणी लागू करावी  

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movement of non teaching staff nashik marathi news