Bharat Band updates : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

गोपाळ शिंदे
Tuesday, 8 December 2020

सरकारच्या कृषी कायद्यात सुधारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना,सीआयटू कामगार संघटना यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

घोटी (जि.नाशिक) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना,व्यापारी बंधावांकडून इगतपुरी तालुक्यातील बाजारपेठेत संमिश्र प्रतिसाद दिसून आला आहे.

भारत बंदमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विरळ व संथ गतीने सुरू आहे. तर अवजड वाहतूकदार रस्त्याच्या बाजूला वाहने लावून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून आले. घोटी कृषी उत्पन्न बाजार पेठ खरेदी विक्री बंद असल्याचे चित्र होते.मात्र किरकोळ भरेकरी यांनी शेती माल खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र शेत मालाचा तुटवडा दिसून आला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात सुधारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना,सीआयटू कामगार संघटना यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तर सीआयटू तर्फे गोंदे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांवरील गेट वर आंदोलन करून पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात आले.

 

हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा

 

हेही वाचा- अखेर बेपत्ता शेतमजूराचा शोध लागला; पण धक्कादायक दृश्याने गावात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai nashik highway transport on bharat band nashik marathi news