रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर नाशिक जिल्ह्यातील रिसॉर्ट पोलिसांच्या रडारवर; ड्रग्ज कनेक्शनमुळे धाडसत्र

सतीश निकुंभ
Wednesday, 16 September 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या आणि रिया चक्रवर्तीची ड्रग्ज प्रकरणातील चौकशीमुळे मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू केले आहे. यामुळे चित्रपटनगरीशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणलेले असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील अनेक रिसॉर्ट पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संदर्भात दोन दिवसांपासून इगतपुरी, घोटी व त्र्यंबकेश्‍वर परिसरात अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आल्याचे समजते.

नाशिक / सातपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या आणि रिया चक्रवर्तीची ड्रग्ज प्रकरणातील चौकशीमुळे मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू केले आहे. यामुळे चित्रपटनगरीशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणलेले असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील अनेक रिसॉर्ट पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संदर्भात दोन दिवसांपासून इगतपुरी, घोटी व त्र्यंबकेश्‍वर परिसरात अनेक ठिकाणी तपासणी करण्यात आल्याचे समजते.

रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर ड्रग्ज कनेक्शनमुळे धाडसत्र

सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी रिया चक्रवर्ती व तिच्या भावाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आणि संबंधितांकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारे ड्रग्जचे दलाल आणि फिल्मसिटीतील कलावंत, फायनान्सर, दिग्दर्शक आदी आता पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, मुंबई ड्रग्जचे मुख्य केंद्र मानले जाते, तसेच महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर, पुणे आदींबरोबरच नाशिक जिल्हाही उपकेंद्र म्हणून पुढे येत आहे. जिल्ह्यात इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्‍वर या भागात चित्रनगरीतील अनेक स्टार, अवैध धंद्यातील किंग, दलाल, तसेच बांधकाम व्यावसायिक व अन्य क्षेत्रातीलही काही जणांचे रिसॉर्ट आहेत.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

मुंबईनंतर नाशिकमध्येही अनेक रिसॉर्टच्या माध्यमातून ड्रग्ज कनेक्शन समोर

विशेषत: लैला खान हत्या प्रकरणानंतर खऱ्या अर्थाने या भागातील ड्रग्ज व गँगस्टरशी संबंधित अनेक बाबी उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तीन वर्षांत या भागात अनेक रेव्ह पार्ट्यांवर वेळोवेळी कारवाई केली आहे. त्यावरूनही या भागात ड्रग्ज कनेक्शनचा अंदाज येऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा सर्व पार्श्‍वभूमीवर रिया व तिच्या भावाला अटक झाल्यानंतर मुंबईसह गोवा व महाराष्ट्राच्या अन्य भागातील दलालांवर आता मुंबई पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. यात आतापर्यंत पाचपेक्षा जास्त दलालांना अटक करण्यात आली आहे. त्यातील काही जणांचे मुंबईबरोबरच नाशिकमध्येही अनेक रिसॉर्टच्या माध्यमातून ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्‍वर या भागातील रिपोर्टनुसार मुंबई पोलिसांनी धाडसत्र व तपासणी सुरू केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन : रमेश चौधरी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai Police raid Resort in Nashik district marathi news