esakal | मुंबई-शालिमार, किसान एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत धावणार; गाडीला चांगला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

railway 1.jpg

रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल. 

मुंबई-शालिमार, किसान एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत धावणार; गाडीला चांगला प्रतिसाद

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. 
शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल. 

हे आहेत थांबे 
तर परतीची (००११४) पार्सल विशेष रोज रात्री सव्वानऊला शालिमार येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे अकराला पोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पाशकुडा, मेचेदा हे थांबे दिले आहेत. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

किसान पार्सल एक्स्प्रेस 
लॉकडाउन काळात देवळाली स्थानकाहून सुरू करण्यात आलेली देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल ३१ डिसेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. या गाडीला प्रतिसाद वाढत असल्याने ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. गाडी (००१०७) डाउन देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी ही मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस देवळाली स्थानकाहून सायंकाळी सहाला सुटून रविवारी पहाटे पावणेपाचला मुजफ्फरपूर स्थानकात पोचेल. गाडी ००१०८ अप मुजफ्फरपूर ते देवळाली ही गाडी दर सोमवार, गुरुवार, शनिवारी मुजफ्फरपूर येथून सकाळी आठला सुटून सोमवारी सायंकाळी पावणेसहाला देवळालीला पोचेल.  

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

संपादन - ज्योती देवरे