ॲपच्या तांत्रिक बिघाडामुळे माहिती पोचण्यास अडथळा; महापालिकेची शासनाकडे तक्रार

विक्रांत मते
Wednesday, 7 October 2020

कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार सुरू केले जात आहेत. सर्वेक्षणासाठी महापालिकेने ७९४ पथके तयार केली असून, दिवसभरात ५० घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पथकामार्फत ८ लाख ६६ हजार १५३ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरात ॲपच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे राज्य शासनाच्या आरोग्य विभागापर्यंत माहिती पोचत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ लाख ६६ हजार १५३ नागरिकांपैकी अवघे पंधरा हजार कुटुंबांची माहिती पोचल्याने ऑफलाइन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

ऑफलाइन सर्वेक्षण सुरू 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरात सर्वेक्षण सुरू आहे. ट्रेस, ट्रॅक व ट्रीट या त्रिसूत्रीनुसार प्रत्येक घरात अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करून अॅपमध्ये भरली जात आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार सुरू केले जात आहेत. सर्वेक्षणासाठी महापालिकेने ७९४ पथके तयार केली असून, दिवसभरात ५० घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पथकामार्फत ८ लाख ६६ हजार १५३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीचे प्रमाण ४६ टक्के आहे. ॲपमध्ये संकलित केलेली माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला पाठविणे बंधनकारक आहे. राज्य शासनाच्या ॲपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे माहिती नोंदवता येत नसल्याची कबुली वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाकडे तक्रार नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा >   भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

४१ हजार कोमॉर्बिड रुग्ण 

२५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सर्वेक्षणात आत्तापर्यंत ४१ हजार गंभीर आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यात १७ हजार १२२ मधुमेहाचे, उच्च रक्तदाबाचे २२ हजार ७७२, ह्रदयविकाराचे ८२६, मूत्रपिंड विकाराचे २३०, यकृत आजाराचे ५५ रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporations complaint to the government for app nashik marathi news