पालिका निवडणुकांचा वाजला बिगुल! प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

प्रशांत कोतकर 
Tuesday, 13 October 2020

राज्यात नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तीन नगर परिषदा व ६५ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम सोमवारी (ता. १२) जाहीर करण्यात आला

नाशिक : राज्यात नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तीन नगर परिषदा व ६५ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम सोमवारी (ता. १२) जाहीर करण्यात आला. यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण व सुरगाणा पालिकांचा समावेश आहे. 

प्रभागरचनेचे तीन मुख्य टप्पे

प्रभागरचना अंतिम करण्याबाबतचे यापूर्वीचे संबंधित आदेश अधिक्रमित करून राज्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचे अधिकार संबंधित मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना प्रदान केले आहेत. प्रभागरचनेचे तीन मुख्य टप्पे राहणार आहेत. यात आरक्षणासह प्रारूप प्रभागरचना करणे, हरकती व सूचनांवरील सुनावणी घेणे व अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे असे असणार आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम असा 
-प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे : २१ ऑक्टोबर 
-जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावास मान्यता : २९ ऑक्टोबर 
-जिल्हाधिकाऱ्यांकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटिशीची प्रसिद्धी : ३ नोव्हेंबर 
-पालिका मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढणे : १० नोव्हेंबर 
-हरकती व सूचना : १८ ते २६ नोव्हेंबर 
-प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी : ४ डिसेंबर 
-जिल्हाधिकाऱ्यांकडून हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय : १० डिसेंबर 
-विभागीय आयुक्तांकडून अंतिम प्रभागरचनेस मान्यता : १७ डिसेंबर 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal election will be start nashik marathi news