खळबळजनक! म्हाडा वसाहतीत गर्भवती महिलेचा खून; पाथर्डी फाटा परिसरातील घटना

राजेंद्र बच्छाव
Sunday, 25 October 2020

कानातील आणि गळ्यातील दागिने आणि मोबाईल सापडला नाही. महिलेचा फोन लागत नसल्याने खासगी कंपनीत कामावर असलेला पती बघण्यासाठी घरी आल्यानंतर दाराला बाहेरून कडी घातली होती. त्याने दार उघडल्यानंतर ही घटना समोर आली.

नाशिक : (इंदिरानगर)पाथर्डी फाटा भागात असलेल्या म्हाडा वसाहतीत गर्भवतीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेले नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले. सर्व बाबींची शक्यता पडताळण्यात येत आहे. 

अशी आहे घटना

स्थानिक महिलांच्या माहितीनुसार, प्रणाली भरत जाधव (वय २६, रा. सदनिका क्रमांक १००२, सी विंग, म्हाडा वसाहत) यांचे पती दुपारी चारला घरी आल्यानंतर ‘पत्नी मृत झाली’, असे ओरडतच बाहेर पडले. त्यामुळे आसपासचे नागरिक तेथे जमा झाले असता, महिलेच्या तोंडाला रूमाल बांधलेला होता. तर पाय ओढणीने बांधले होते. संपूर्ण शरीराला वायरने बांधून ब्लॅंकेटने मृतदेह झाकून ठेवला होता. कानातील आणि गळ्यातील दागिने आणि मोबाईल सापडला नाही. महिलेचा फोन लागत नसल्याने खासगी कंपनीत कामावर असलेला पती बघण्यासाठी घरी आल्यानंतर दाराला बाहेरून कडी घातली होती. त्याने दार उघडल्यानंतर ही घटना समोर आली. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

महिला चार-पाच महिन्यांची गरोदर

वर्षभरापासून हे जोडपे नातलगाच्या मालकीच्या सदनिकेत भाडेतत्त्वावर राहात होते. महिला चार-पाच महिन्यांची गरोदर होती. पोलिसांना कळविल्यानंतर उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर आणि अधिकारी मृत महिलेच्या घरातच चौकशी करत होते. श्वान पथकाची मदत घेण्यात आली. महिलेचा मृतदेह तेथेच रुग्णवाहिकेत उशिरापर्यंत ठेवला होता.  

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a pregnant woman in Mhada colony nashik marathi news