भाजीपाला बाजारातच घडला थरार.. पूर्ववैमनस्यातून तरुणावर तिघांनी केले वार

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवर भाजीपाला बाजार भरतो. त्याठिकाणी एक थरारक प्रकार घडला आहे. पूर्ववैमनास्यातून चौघांमध्ये झटापटी झाली. अन् त्यातून घडला धक्कादायक प्रकार

नाशिक / साकोरा : साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवर भाजीपाला बाजार भरतो. त्याठिकाणी एक थरारक प्रकार घडला आहे. पूर्ववैमनास्यातून चौघांमध्ये झटापटी झाली. अन् त्यातून घडला धक्कादायक प्रकार..

अशी घडली घटना 
साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवर भाजीपाला बाजार भरतो. तेथे विजय शंकर शिंदे (वय 35) व कोकणवाड्यातील संशयित निवृत्ती महादू हिलम, बंडू महादू हिलम व कुसुमबाई निवृत्ती हिलम यांच्यात पूर्ववैमनास्यातून झटापटी झाली. यात विजय शिंदे याच्या चाकूने वार करण्यात आले. तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, नांदगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक शिरोडकर, उपनिरीक्षक दळवी आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी विजय यास नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी मृत घोषित केले. पोलिसांनी निवृत्ती हिलम, बंडू हिलम व कुसुमबाई हिलम यांना ताब्यात घेतले आहे. हवालदार राजू मोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

तीन संशितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

येथील वांदरदेव चौफुलीवरील नांदगाव- वेहळगाव रस्त्यावर मंगळवारी (ता. 30) सायंकाळी पूर्ववैमनास्यतून तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी तीन संशितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a young man Sakora nashik marathi news