'अगर अल्लाह ने चाहा तो घरवालो के साथही ईद मनाई जाऐगी'...क्वारंटाइन मुस्लिम बांधवांना आशा!

devotee.jpg
devotee.jpg

नाशिक : (जुने नाशिक) लॉकडाउनमुळे पश्‍चिम बंगालमधील पांडवा शरीप येथे अडकलेले शहरातील 208 भाविक बुधवारी (ता. 13) परतले. त्यांना क्वारंटाइन करत नासर्डी पूल येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. शहरात परतल्यावर "इन्शा अल्ला, घरवालो के साथही ईद मनाई जाऐगी', अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. 

परतलेल्या क्वारंटाइन भाविकांची आशा 

पांडवा शरीप येथील उरूसानिमित्त शहर-जिल्ह्यातील 300 मुस्लिम भाविक पश्‍चिम बंगाल येथे गेले होते. त्यातील काही भाविक परतले होते. 208 भाविकांचे 23 मार्चला परतीचे रेल्वे तिकीट होते. त्यापूर्वीच कोरोनामुळे केंद्र सरकारने देशात लॉकडाउनची घोषणा केली. रेल्वेसेवा बंद झाल्याने दोन महिन्यांपासून सर्व भाविक त्याठिकाणी अडकून पडले होते. भाविकांच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता पसरली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे त्याचप्रमाणे दिल्ली येथील आयूब अहमद आणि मुंबईचे नाझीम शेख यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. शनिवार (ता. 9) पांडवा शरीप येथील जिल्हा प्रशासनाकडून सर्व भाविकांची तपासणी करून त्यांना नाशिककडे रवाना करण्यात आले. राज्याच्या सीमेपर्यंत त्यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले. त्यानंतर राज्यात प्रवेश करताच त्यांना विविध ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागले. 

घरी जाण्याचा मार्ग मोकळा

पाच दिवसांच्या प्रवासानंतर बुधवारी (ता. 13) रात्री ते शहरात दाखल झाले. पोलिस बंदोबस्तात त्यांना नासर्डी येथील समाजकल्याण वस्तीगृहात क्वारंटाइन करण्यात आले. त्यांची विविध प्रकारची तपासणी सुरू आहे. खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन केले असले तरी तपासणीअंती त्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली रमजान ईद कुटुंबीयांसोबत साजरी करता येऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नियमाप्रमाणे जिल्हा प्रशासन आणि डॉक्‍टरांचे पथक यावर काय निर्णय घेते, यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com