"मराठा आरक्षणाबरोबर मुस्लिम आरक्षणही द्यावे" वाचा कोणी केली मागणी

प्रमोद सावंत
Wednesday, 16 September 2020

समितीच्या अहवालानुसार राज्यात मुस्लिम समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीपेक्षाही मागास व दयनीय अवस्थेत आहे. 

नाशिक / मालेगाव : समितीच्या अहवालानुसार राज्यात मुस्लिम समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीपेक्षाही मागास व दयनीय अवस्थेत आहे. 

अशोक चव्हाण यांना मागणीचे निवेदन

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली. शेख यांनी बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांना मागणीचे निवेदन पाठविले आहे.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

‘मराठाबरोबर मुस्लिम आरक्षण द्यावे’ 

निवेदनात राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे. न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, रंगनाथ मिश्रा व डॉ. महेमूद रहेमानी समितीच्या अहवालानुसार राज्यात मुस्लिम समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीपेक्षाही मागास व दयनीय अवस्थेत आहे. शासनाने समितीच्या या शिफारशींना मान्यता दिली आहे. तत्कालीन शासनाने नागपूर अधिवेशनात मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाचा आदेश काढला होता. त्यासोबत असलेला मुस्लिम आरक्षणाचा आदेश काढलेला नाही. शासनाने मुस्लिम समाजाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी केली आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim reservation should also be given asif shaikh said nashik malegaon marathi news