नांदगाव हत्याकांड ब्रेकिंग : अश्रुंचा तुटला बांध! ग्रामस्थांच्या भावनांचा कल्लोळ; महिलांचा पोलीसांवर गंभीर आरोप

भारत देवरे / संजीव निकम 
Friday, 28 August 2020

नांदगाव तालुक्यातील वाखारी हत्याकांडाला बावीस दिवस उलटलेत. पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न निघत नसल्याच्या निषेधार्थ आज (ता.२८) गावकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सोबत पोलीसांवर गंभीर आरोप इथले ग्रामस्थ करत आहेत. त्यातून धक्कादायक खुलासा होत आहे

नाशिक / नांदगाव : नांदगाव तालुक्यातील वाखारी हत्याकांडाला बावीस दिवस उलटलेत. पोलिसांच्या तपासातून काहीच निष्पन्न निघत नसल्याच्या निषेधार्थ आज (ता.२८) गावकऱ्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सोबत पोलीसांवर गंभीर आरोप इथले ग्रामस्थ करत आहेत. त्यातून धक्कादायक खुलासा होत आहे

भावनांचा कल्लोळ अश्रुंचा तुटला बांध..रडत रडत गावकऱ्यांचा संताप

हत्याकांड होऊन बावीस दिवस झाले...अद्यापही गावकरी दहशतीखाली वावरत आहेत.  चौकशीच्या नावाखाली निरापराध गावक-यांना मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप गावकरी पोलीसांवर करत आहेत. "पैसे घ्या गुन्हा कबुल करा" असा आरोप गावातील महिलांचा पोलीसांवर होत आहे. आरोप घटनास्थळी आमदार सुहास कांदे, तपासाधिकारी साळवे हे देखील दाखल झालेत.

आंदोलन दडपण्याचा पोलीसांचा प्रयत्न - ग्रामस्थ

तपास पुढे सरकत नाही मारेकऱ्यांचा शोध लावण्यात पोलीसांना अपयश आले.महाराष्ट्र शासनाचा निषेध असो मारहाण करणाऱ्या पोलीसांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या जाताहेत. तसेच या प्रकरणी नोटीसा काढून आंदोलन दडपण्याचा पोलीसांचा प्रयत्न ग्रामस्थ आरोप करताहेत

गावकरी अजूनही दहशतीखाली

 

दरम्यान नांदगाव हत्याकांडात घटना घडल्यापासून वीस दिवस झाले तरी तपास लागत नसल्याच्या मुद्द्यवरून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यातही लागत नसल्याबाबद्दल त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते पोलिसांच्या काहीच हाती लागत नसून मारेकरी अजूनही सापडत नाहीत त्यामुळे गावकरी अजूनही दहशतीखाली आहेत.

तपासात प्रगती नाही

हत्याकांडातील मृताचे आईवडील भाऊ गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता स्वातंत्र्यदिनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनाही निवेदन दिले होते पोलिसांच्या तपासातून मारेकरी गवसत नसतील तर या घटनेचा तपस सीआयडीकडे सोपविण्याचे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनीही दिले होते. निवेदने दिल्यावरही तपासाची प्रगती फारशी होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे शुकेरवारी सकाळी साडे नऊ वाजता मालेगाव रस्त्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्क

निवेदनावर शिवसेन नेते संजय चव्हाण बालनाथ चव्हाण दीपक चव्हाण तसेच हत्याकांडातील मयत समाधान चव्हाण यांचे भाऊ दादा चव्हाण वडीलअण्णा चव्हाण आई चंद्रकलाबाई चव्हाण यांच्यासह योगेश गोकील, योगेश चव्हाण संधान काकळीज, पांडुरंग चव्हाण, वानजी चव्हाण, केवल काकळीज, मोठाभाऊ सोनवणे, शांताराम चव्हाण, दादा काकळीज, ज्ञानेश्वर चव्हाण, रवींद्र चव्हाण, विकास काकळीज, गणेश चव्हाण, साहेबराव काकळीज ,प्रकाश चव्हण, दीपक काकळीज, भाऊसाहेब सोनवणे आदी गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandgaon vakhari murder case villagers agitation nashik marathi news