पर्यटकांचा हिरमोड! नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी बंदच राहणार

महेंद्र महाजन
Friday, 2 October 2020

देशातील पर्यटनाला हिरवा कंदील मिळाला आहे. तरीही नाशिकमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता, तूर्ततरी नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करणे शक्य नाही. असे वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. 

नाशिक : देशातील पर्यटनाला हिरवा कंदील मिळाला आहे. तरीही नाशिकमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता, तूर्ततरी नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करणे शक्य नाही. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी मिळाल्यावर पक्षी अभयारण्य खुले करण्यात येईल, असे वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. 

अभयारण्य सध्याच्या परिस्थितीत सुरू करणे अवघड
वन्यजीव पर्यटनाला देशात शुक्रवार (ता.२) पासून सुरू होत आहे. वन्यजीव सप्ताहामध्ये वन्यजीव पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्येचा विचार करता, निवडक अभयारण्य वगळता इतर अभयारण्य बंद राहणार आहेत. आजपासून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू झाला असल्याने पक्षी अभयारण्य देखील सुरू होईल, अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करत होते. प्रत्यक्षात मात्र रुग्ण संख्या पाहता, पक्षी अभयारण्य सध्याच्या परिस्थितीत सुरू करणे अवघड आहे.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

या  ठिकाणी ऑनलाइन आरक्षण सुरू

सध्याच्या परिस्थितीत अभयारण्य खुले करायचे म्हटल्यास अगोदर मोठी तयारी करावी लागणार आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्या लागतील. सोशल मीडियातून ताडोबा सफारीमध्ये दर्शन देणाऱ्या वाघांची छायाचित्रे व्हायरल झाल्याने अभयारण्याबद्दलची माहिती वन्यजीव विभागाकडून घेण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे (महाबळेश्वर, भीमाशंकर आणि एलिफंटा सोडून) पूर्णपणे ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. 

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandurmadhameshwar Bird Sanctuary closed for tourists nashik marathi news