सेलिब्रेटी सुरक्षा, लवाजमा मागे ठेवत नरहरी झिरवाळांनी धरला आदिवासी नृत्याचा ठेका! VIDEO होतोय व्हायरल

दिगंबर पाटोळे
Tuesday, 5 January 2021

साधे सरळ राहणीमान असलेले व सर्वसामान्यामध्येच सतत वावरणारे  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ..पण एका कार्यक्रमा दरम्यान रेल्वे स्टेशनवर झिरवाळ यांच्या स्वागताकरिता आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यावेळी असे काही घडले सेलिब्रेटी सुरक्षा, लवाजमा पाठीमागे ठेवत त्याचा मोह झिरवाळांनाही आवरता आला नाही. 

वणी (जि.नाशिक) : साधे सरळ राहणीमान असलेले व सर्वसामान्यामध्येच सतत वावरणारे  विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ..पण एका कार्यक्रमा दरम्यान रेल्वे स्टेशनवर झिरवाळ यांच्या स्वागताकरिता आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यावेळी असे काही घडले सेलिब्रेटी सुरक्षा, लवाजमा पाठीमागे ठेवत त्याचा मोह झिरवाळांनाही आवरता आला नाही. 

आनंदात सहभागी होत गोंडी नृत्यावर धरला ठेका

सोमवारी, (ता. ४) नागपूर येथे  विधानभवन कार्यालय उद्घटनासाठी रेल्वेद्वारे गेले असता. रेल्वे स्टेशनवर झिरवाळ यांच्या स्वागताकरिता विदर्भातील आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यावेळी स्टेशनबाहेर उपस्थित आदिवासी बांधवानी आनंद व्यक्त करीत आदिवासी गोंडी नृत्य पथकाने नृत्य सादरीकरण करीत स्वागत करीत असतांना स्वागतासाठी जमलेल्या बांधवाचा आनंद द्विगणीत करण्यासाठी नरहरी झिरवाळ यांनीही सेलिब्रेटी सुरक्षा, लवाजमा पाठीमागे असतानाही हे सर्व बाजुला ठेवून आपल्या बांधवाच्या आनंदात सहभागी होत गोंडी नृत्यावर स्वतःही ठेका  ठरत व ताल धरत त्यांच्याबरोबर नृत्याचा आनंद घेतला.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

यावेळी झिरवाळ यांनी 'माझ्या सारख्या साध्या माणसाचे आपण अत्यंत प्रेमाने स्वागत केल्याचे म्हणून सर्वांचे  मनापासून आभार मानले. यावेळी झिरवाळांचा नृत्याविष्कार उपस्थितांना मोहित करून आपलेसे करून गेला.

हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narhari zirwal tribal folk dance viral nashik marathi news