नाशिक-अहमदाबाद विमानसेवा पूर्ववत; 'अशा' आहेत विमानाच्या वेळा...वाचा

संदीप मोगल
Sunday, 13 September 2020

अखेर देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्याने विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. नियमितपणे सुरू असलेल्या विमानसेवेला प्रतिसादाची अपेक्षा आहे.

नाशिक : (लखमापूर) दीड महिन्यापासून अधिक काळापासून बंद असलेली नाशिक-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. विमानतळ प्रशासनानेही नाशिक-अहमदाबाद विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

विमानसेवेला प्रतिसादाची अपेक्षा

ओझर विमानतळावरून नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवा मागील १० जुलैपासून बंद झाली होती. लॉकडाउनचा रेल्वे, रस्ते वाहतुकीप्रमाणे विमानसेवेला फटका बसला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची नाराजी होती. अखेर देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्याने विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. नियमितपणे सुरू असलेल्या विमानसेवेला प्रतिसादाची अपेक्षा आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

विमानाच्या वेळा 

नाशिक-अहमदाबाद विमान सायंकाळी साडेसहाला अहमदाबाद येथून निघेल व नाशिक विमानतळावर सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पोचेल. त्यानंतर नाशिक विमानतळावरून रात्री आठ वाजून २० मिनिटांनी निघून रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी अहमदाबादला पोचेल, असे साधारण विमानसेवेचे वेळापत्रक असून, प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik-Ahmedabad flight resumed nashik marathi news