सुरू होतेय तर नाशिक विमानसेवा! विमानतळावर प्रवाशांची लगबग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यांपासून बंद पडलेली नाशिकची विमानसेवा अखेर पूर्ववत सुरू होणार आहे. त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या सेवेसाठी तिकीट बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यांपासून बंद पडलेली नाशिकची विमानसेवा अखेर पूर्ववत सुरू होणार आहे. त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या सेवेसाठी तिकीट बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.

शासनाच्या सूचनांचे पालन करीत विमानसेवा

मार्च महिन्यांपासून बंद पडलेली नाशिकची विमानसेवा येत्या १ जूनपासून पूर्ववत सुरू होणार असून, त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या सेवेसाठी शुक्रवारपासून (दि.२२) तिकीट बुकिंग सुरू झाले.नाशिक शहराला अन्य शहर आणि राज्याला जोडणारी  नाशिकहून पुणे तसेच नाशिकहून अहमदाबाद आणि हैदराबादसाठी ही सेवा सुरू होत आहे. त्यासाठी आता ओझर येथील विमानतळावर लगबग वाढली आहे. केंद्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करीत ही सेवा सुरू होणार आहे.

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

पुण्याहून नागपुर व नाशिकसह नऊ शहरांसाठी विमान सेवा

लॉकडाऊनमुळे दोन महिने ठप्प असलेल्या पुणे विमानतळावरून नागपुर व नाशिकसह नऊ शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी काही विमान कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावांना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) मान्यता दिली आहे. त्यानुसार काही कंपन्यांनी तिकीट बुकींगला सुरूवातही केली आहे.देशातील विमानसेवा दि. २५ मे पासून सुरू होत आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून निवडक शहरांसाठीच ही सेवा सुरू होणार आहे.

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Airlines finally starting after lockdown nashik marathi news