esakal | नाशिक-बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून; आता तीनच तासांत गाठा गोवा, कोल्हापूर

बोलून बातमी शोधा

nashik belgaoan flight will start from 25 January nashik marathi news

हैदराबाद दिल्ली पुणे, मंगळूर, अहमदाबाद विमान सेनेनंतर आता ओझरहून बेळगावसाठी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत येत्या २५ जानेवारी पासून नाशिक बेळगाव ही विमानसेवा सुरू होणार आहे. 

नाशिक-बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून; आता तीनच तासांत गाठा गोवा, कोल्हापूर
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : हैदराबाद दिल्ली पुणे, मंगळूर, अहमदाबाद विमान सेनेनंतर आता ओझरहून बेळगावसाठी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत येत्या २५ जानेवारी पासून नाशिक बेळगाव ही विमानसेवा सुरू होणार आहे . 

पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी

नाशिक बेळगाव विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि गोव्याला अवघ्या दीड ते दोनच तासात पोहोचणे शक्य होणार आहे. उडाण योजनेअंतर्गत नाशिक शहर देशभरातील मोठ्या शहरांना जोडले जावे यासाठी काही वर्षांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील आहेत . त्यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक येथील ओझर विमानतळावरून हैदराबाद, दिल्ली, पुणे, बंगळूर, अहमदाबाद या ठिकाणची विमानसेवा कार्यरत आहे. नाशिक येथून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तसेच गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नाशिक - बेळगाव या दरम्यानची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी खासदार गोडसे यांच्याकडे मागणी केली होती . 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

असे असतील दर

येत्या २५ जानेवारी पासून नाशिक - बेळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्रशासनाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतला आहे . या विमानाची आसन क्षमता ५० सीटची असेल. त्यातील २५ सिटांसाठी तिकीटावर पन्नास टक्के अनुदान असेल. नाशिक - बेळगाव या विमानसेवेसाठी सुमारे २२०० ते २५०० रूपये तिकिट असणार आहे. आठवडयातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार असून यामध्ये सोमवार, शुकवार आणि रविवारचा समावेश असणार आहे. विमान बेळगावहून सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी निघेल. नाशिकला ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. नाशिक येथून सव्वा सहाला सुटन बेळगावला सव्वा सात वाजता पोहोचणार आहे. नाशिक - बेळगाव हा प्रवास अवघ्या एक तासाचाच असणार आहे. बेळगाव येथून गोवा आणि कोल्हापूर रस्त्याने दिड ते दोन तासांचा प्रवास असणार आहे . 

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी


विमान सेवेमुळे नाशिक येथून कोल्हापूर आणि गोवा अवघ्या अडीच ते तीन तासांचाच प्रवास असेल. विमानसेवेमुळे उद्योग , व्यवसाय आणि पर्यटनाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. 
- हेमंत गोडसे (खासदार नाशिक)