esakal | नाशिक-बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून; कोल्हापूर-गोव्याचा प्रवास होणार तीन तासांचा 

बोलून बातमी शोधा

ozar airport.jpg

हैदराबाद, दिल्ली, पुणे, मंगळूर, अहमदाबाद विमानसेनेनंतर आता ओझरहून बेळगावसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत येत्या २५ जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे . 

नाशिक-बेळगाव विमानसेवा २५ जानेवारीपासून; कोल्हापूर-गोव्याचा प्रवास होणार तीन तासांचा 
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : हैदराबाद, दिल्ली, पुणे, मंगळूर, अहमदाबाद विमानसेनेनंतर आता ओझरहून बेळगावसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय नागरी वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत येत्या २५ जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे . 

कोल्हापूर-गोव्याचा प्रवास होणार तीन तासांचा 

नाशिक-बेळगाव विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि गोव्याला अवघ्या दीड ते दोनच तासांत पोचणे शक्य होणार आहे. उडान योजनेंतर्गत नाशिक शहर देशभरातील मोठ्या शहरांना जोडले जावे यासाठी काही वर्षांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक येथील ओझर विमानतळावरून हैदराबाद, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, अहमदाबाद या ठिकाणची विमानसेवा कार्यरत आहे. नाशिक येथून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, तसेच गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नाशिक-बेळगाव दरम्यानची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी जिल्ह्यातील अनेकांनी खासदार गोडसे यांच्याकडे मागणी केली होती. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

आठवड्यातून तीन दिवस 
येत्या २५ जानेवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतला आहे. या विमानाची आसनक्षमता ५० सीटची असेल. त्यातील २५ सिटांसाठी तिकिटावर ५० टक्के अनुदान असेल. नाशिक-बेळगाव या विमानसेवेसाठी सुमारे २२०० ते २५०० रुपये तिकिट असणार आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार असून, यामध्ये सोमवार, शुक्रवार आणि रविवारचा समावेश असणार आहे. विमान बेळगावहून सायंकाळी चार वाजून ४० मिनिटांनी निघेल. नाशिकला पाच वाजून ४० मिनिटांनी पोचणार आहे. नाशिक येथून सव्वासहाला सुटून बेळगावला सव्वासातला पोचणार आहे. नाशिक-बेळगाव हा प्रवास अवघ्या एक तासाचाच असणार आहे. बेळगाव येथून गोवा आणि कोल्हापूर रस्त्याने दीड ते दोन तासांचा प्रवास असणार आहे. 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

विकासाला मोठी चालना

विमानसेवेमुळे नाशिक येथून कोल्हापूर आणि गोवा अवघ्या अडीच ते तीन तासांचाच प्रवास असेल. विमानसेवेमुळे उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. -हेमंत गोडसे, खासदार, नाशिक