नाशिक शहराचा शनिवारी पाणीपुरवठा बंद; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती 

विक्रांत मते
Wednesday, 25 November 2020

२८ नोव्हेंबरला संपूर्ण शहराला होणारा सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. रविवारी (ता. २९) नाशिक रोड वगळता उर्वरित विभागांमध्ये सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. 

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून जलशुद्धीकरण केंद्रांना जोडणाऱ्या वाहिन्यांच्या गळतीचे काम, तसेच विद्युतविषयक कामे हाती घेतली जाणार असल्याने शनिवारी (ता. २८) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

नाशिक शहराचा शनिवारी पाणीपुरवठा बंद 

गोंदे येथील रेमंड सबस्टेशनमध्ये विद्युतविषयक कामे केली जाणार असल्याने या भागातील वीजपुरवठा शनिवारी सकाळी नऊ ते सहा या वेळेत बंद राहणार असल्याने विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा होणार नाही. गंगापूर धरण पंपिंग स्टेशनमधून बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर, नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी गुरुत्ववाहिनीला मुक्त विद्यापीठ येथील रस्त्यावर गळती लागल्याने काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. नाशिक रोड विभागात इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या आवारात पाण्याची गळती बंद करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात पंप जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने २८ नोव्हेंबरला संपूर्ण शहराला होणारा सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. रविवारी (ता. २९) नाशिक रोड वगळता उर्वरित विभागांमध्ये ‘सकाळ’चा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik city water supply closed on Saturday marathi news