आनंदवार्ता! 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानांत 'नाशिक' जिल्हा प्रथम; आतापर्यंत जवळपास चार लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 1 October 2020

राज्यातील 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानांर्तगत केलेल्या सर्वेक्षणातील दमदार संख्येमुळे 'नाशिक' जिल्हा या अभियानात पहिल्या स्थानी असल्याचे वृत्त आहे

नाशिक :  राज्यातील 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानांर्तगत केलेल्या सर्वेक्षणातील दमदार संख्येमुळे 'नाशिक' जिल्हा या अभियानात पहिल्या स्थानी असल्याचे वृत्त आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला अधिकृत दुजोरा दिला नाही. जिल्हाभरात ४० टक्के नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. 

आतापर्यंत ४ लाख ५९ हजार घरांचे सर्वेक्षण

राज्य सरकारच्या वतीने १५ सप्टेंबरपासून या अभियानास सुरुवात करण्यात आली होती. अभियानांतर्गत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे रोज ५० कुटुंबांची आरोग्यविषयक माहिती संकलित करून ती ॲपद्वारे अद्ययावत केली जाते. या अभियानांतर्गत आतापर्यंत तपासणी केलेल्या नागरिकांमधून ११४५ रुग्ण बाधित सापडले.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत आतापर्यंत ४ लाख ५९ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

सारी आजाराचे ८०७ रुग्णही आढळले

माहितीच्या विश्लेषणातून संशयित वाटणाऱ्या रुग्णास जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित केले जाते. या पथकांच्या माध्यमातून सुमारे ४ लाख ५९ हजार घरांना भेटी देण्यात आल्या. आतापर्यंत सुमारे २१ लाख ४४ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. या पथकांना सारी या आजाराचे ८०७ रुग्णही आढळून आले आहेत. पथकांनी निर्देशित केलेल्या नागरिकांपैकी ११४५ नागरीक कोरोनाबाधित आढळले आहेत. १९०५ पथकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik district first in 'My family, my responsibility' campaign nashik marathi news