BREAKING : नाशिक जिल्ह्यात आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह..जिल्ह्यातील आकडा ४८ वर

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 16 April 2020

नाशिक जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. नाशिकच्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील ६३ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात मालेगावच्या ६४ वर्षांचे एक वृद्ध इसम कोरोना पॉझिटिव्ह असून नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४८ वर आली आहे.. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. नाशिकच्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील ६३ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत आहे. ज्यात मालेगावच्या ६४ वर्षांचे एक वृद्ध इसम कोरोना पॉझिटिव्ह असून नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४८ वर आली आहे.. 

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये कोरोनाची महामारी पसरत चालली आहे. नाशिकमध्येही कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना दिसत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बुधवारी परप्रांतीय युवकाला कोरोनाची लागण

नाशिक शहरातील मुंबईतून इगतपुरी मार्गे (ता.१५) नाशिकमध्ये दाखल झालेल्या परप्रांतीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तो नासरडी येथील समाज कल्याण विभागाचे हॉस्टेल येथील निवाराशेडमध्ये होता. महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये त्यास दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. मात्र निवारा शेडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा > मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच  

नाशिक जिल्ह्यात 27 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एकापाठोपाठ मालेगावमध्ये सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी (ता.11) मध्यरात्री मालेगावच्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये रुग्णांची भर पडली, तर रविवारी (ता. 12) दुपारी आणखी 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळाले आहेत. त्यामुळे मालेगावात कोरोना पॉझिटिव्हची संख्या 29 वर पोचली , तर रात्री आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नाशिकला पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे नाशिककरांसह आरोग्य विभागाला थोडा दिलासा मिळाला. परंतु आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या संख्येमुळे प्रशासनाचे धाबे दणालले आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik district has 2 more corona-positive nashik marathi news