मुंबईत वीज गायब, नाशिकला नेटवर्क गायब! नाशिककरांना मनस्‍ताप 

अरुण मलाणी
Tuesday, 13 October 2020

नेटवर्कची समस्‍या नाशिककरांना नवीन नसली, तरी कधीतरी एखाद्या पुरवठादाराच्‍या सेवेवरच परिणाम होत असल्‍याचा अनुभव ग्राहकांना येत होता. परंतु सोमवारी सर्वच सेवा पुरवठादारांचे नेटवर्क प्रभावित झाले होते.

नाशिक : मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्‍याने तारांबळ उडालेली असताना, सोमवारी (ता. १२) नाशिककरांनीही मोबाईल नेटवर्कच्‍या समस्‍येचा सामना केला. दुपारी बाराच्‍या सुमारास फोनच लागत नसल्‍याने नागरिकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. 

नेटवर्क गायब झाल्‍याने नाशिककरांना तासभर मनस्‍ताप 
नेटवर्कची समस्‍या नाशिककरांना नवीन नसली, तरी कधीतरी एखाद्या पुरवठादाराच्‍या सेवेवरच परिणाम होत असल्‍याचा अनुभव ग्राहकांना येत होता. परंतु सोमवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्‍या दरम्‍यान साधारण एक तास सर्वच सेवा पुरवठादारांचे नेटवर्क प्रभावित झाले होते. अचानक उद्‍भवलेल्‍या या अडचणीमुळे ग्राहकांचाही बराच वेळ गोंधळ झाला होता. नेमकी काय तांत्रिक अडचण उद्‍भवली, याबद्दल मात्र ग्राहकांना फारशी माहिती मिळू शकली नाही. एक तासानंतर नेटवर्कची समस्‍या सुरळीत झाल्‍यानंतर सर्वांची सुटकेचा श्‍वास सोडला.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik residents Distressed network disappearance marathi news