अखेर नाशिकची आयएसपी प्रेस होणार सुरू! मात्र अशा आहेत अटी..

note press.jpg
note press.jpg

नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.अशातच दीड-दोन महिन्यांपासून नाशिकरोड येथील नोटा छपाई करणारे चलार्थपत्र मुद्रणालय (प्रेस) बंद करण्यात आली होते. मात्र १४ मे पासून येथील चलनी नोटा छापणारी नोटप्रेस सुरू झाली असून भारत प्रतिभूती मुद्रणालय येत्या १८ मे पासून गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यामुळे त्यावर आधारित छोट्या-मोठ्या उद्योगांना दिलासा मिळणार आहे. मजदूर संघाची आयएसपी व्यवस्थापनाबरोबर बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयएसपी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

या आहेत अटी

प्रेसमध्ये सध्या ज्या कामगारांना बोलावले जाईल, त्यांनीच कामावर यावे. परिस्थिती सुरळीत होईल तसतसे सर्वांना कामावर बोलावले जाईल. अतिमहत्त्वाची कामे प्रथम सुरू केली जाणार .लॉकडाउन शिथिल होईल, तसतसे टप्प्याटप्प्याने उत्पादन सुरू करण्याबाबत चर्चा झाली. कामावर बोलविलेल्या कामगारांनी सुरक्षित वावर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज यांचे नियम पाळावेत. ज्या कामगारांचा संपर्क पुणे, मुंबई, मालेगाव, औरंगाबाद येथील किंवा परदेशी अथवा करोनाग्रस्ताशी, त्यांच्या नातेवाईकांशी आला असेल त्यांनी प्रशासनाला याची कल्पना द्यावी, अन्यथा त्या कामगारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कॅन्टीन बंद राहील. गरजेनुसार वेगवेगळे विभाग टप्प्याटप्प्याने सुरू होतील. लॉकडाउनमध्ये सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांचे फंड, पेमेंट व कम्बाइनधारक सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन लवकरात लवकर कशा सुरू करण्यात येतील, यासाठी मुख्यालयाला सूचना द्याव्यात. कामगारांचे मेडिकल बिल थकले आहेत, त्यांच्यासाठी संबंधित क्लार्कला बोलावून काम सुरू करण्यात यावे ही सूचनादेखील व्यवस्थापनाला करण्यात आली. बिल जमा करण्याची तारीख व वेळ सोशल मीडियावर कळविली जाणार आहे.

अनेक रखडलेली कामे करणार पूर्ण
भारत प्रतिभूती मुद्रणालय मध्ये एन.जे एस.पी., इलेक्शन सील, सरकारी धनादेशाची कामे रखडली आहेत. ती कामे सोमवारी मुद्रणालय सुरू झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येणार आहे. परफोरेशन व एक्झामिनेशनचे काम तसेच बाईंड्रीमधे कटिंग आणि हँन्ड नंबरींग, सी.एस.डी./स्टोअर तसेच एक्साईज सीलचे प्रिंटिंग काम देखील प्रथम सुरु होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com