स्वच्छ सर्वेक्षण निकालात नाशिकची मोठी झेप! ६७ वरून थेट ११ व्या क्रमांकावर चमकदार कामगिरी

विक्रांत मते
Thursday, 20 August 2020

 केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण निकालात नाशिक ने मोठी झेप घेतली असून 67 वरून 11 व्या क्रमांकावर झेप घेत चमकदार कामगिरी केली आहे. देशभरातील 20 शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर पुन्हा एकदा प्रथम स्थानी तर महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थानी आले.

नाशिक :  केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण निकालात नाशिक ने मोठी झेप घेतली असून 67 वरून 11 व्या क्रमांकावर झेप घेत चमकदार कामगिरी केली आहे. देशभरातील 20 शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर पुन्हा एकदा प्रथम स्थानी तर महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थानी आले.

निकालात मोठी बाजी
मार्च महिन्यात  केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून देशभरातील स्वच्छ आणि कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटींगची घोषणा केली त्यात नाशिकला 3 स्टार मिळाल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.  एकीकडे महापालिकेने नवीन वर्षासाठी कंबर कसली असताना गेल्या वर्षाच्या निकालात मोठी बाजी मारल्याने आत्मविश्वास वाढला आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

नागरिकांचा प्रतिसाद ठरला महत्वाचा
गेल्या चार वर्षांपासून देशातील पहिल्या 10 शहरामध्ये येण्याचे स्वप्न यंदाही पूर्ण झाले नाही परंतु प्रशासन ने मिळविलेले हे यश ही कमी नाही. यंदा हागणदारी मुक्ती, घंटागाडीचे नियोजन, शहरातील स्वछता, बायो मेडिकल वेस्ट  नियोजन, श्वान निर्बिणीकरण आदी बाबी बरोबरच  नगरसेवकांच्या सहभाग व नागरिकांचा प्रतिसाद महत्वाचा ठरला. दरवर्षी  नागरिकांचा सहभागा मध्ये नाशिककर कमी पडायचे यंदा नाशिककरांनी प्रतिसाद देऊन ती कमी भरून काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल दिल्लीत जाहीर केला. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पूरी यावेळी उपस्थित होते. राज्यात नवी मुंबई 3, नाशिक 11, ठाणे 14, पुणे 15 तर नागपूर 18 व्या स्थानी आहे. 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik's eleventh rank in clean survey results nashik marathi news