esakal | #Coronafighters : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिवसातले १५ तास देतोय नाशिकचा 'तो' डॉक्टर!
sakal

बोलून बातमी शोधा

dr.prasad dhikle corona fighters.jpg

डॉ. ढिकले यांच्या पत्नी चारुशीला अभियंता आहेत. त्यांचा मुलगा अवनीश (वय 5) नानावटी स्कूलमध्ये शिकतो. या दोघांना त्यांनी ऍड. तोरवणे यांच्याकडे पाठविले आहे. त्यांचे आई-वडील नाशिकला औरंगाबाद नाका भागात राहतात. रोज शुश्रूषेत व्यस्तता असली, तरीही वेळ मिळेल तसे कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत, तब्येत ठीक आहे, भोजन व्यवस्थित आहे, असा संवाद डॉ. ढिकले साधतात. त्यातून कुटुंबीय निर्धास्त होतात आणि आधार मिळतो. तर, त्यातून प्रोत्साहन मिळते, असे डॉ. ढिकले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

#Coronafighters : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिवसातले १५ तास देतोय नाशिकचा 'तो' डॉक्टर!

sakal_logo
By
महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना व्हायरस संसर्गाविरुद्धच्या लढ्यात नाशिकचे डॉ. प्रसाद तुकाराम ढिकले (एमडी) योगदान देत आहेत. मुंबई महापालिकेच्या विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयाच्या सेवेत असलेले डॉ. ढिकले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिवसातील 15 तासांची सेवा देत आहेत. तपासणी आणि शुश्रूषा अखंडित राहावी म्हणून त्यांनी पत्नी आणि मुलाला नाशिकला पाठविले आहे. 

कोरोनाच्या लढ्यात डॉ. प्रसाद ढिकलेंकडून रोज पंधरा तास सेवा 
सिद्धपिंप्री येथील शिक्षक कुटुंबात जन्मलेले डॉ. ढिकले नाशिकमधील ऍड. वसंतराव तोरवणे यांचे जावई आहेत. त्यांनी नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून सरकारी कोट्यातून एमबीबीएस, तर मुंबईच्या केईएम महाविद्यालयातून एम.डी. हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शनिवारी (ता. 21) कुपर रुग्णालयातील त्यांच्या सेवेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुंबईत विमानतळावर तपासणीची नाशिकच्या युवा डॉक्‍टरकडे धुरा 

गेल्या 6 मार्चला त्यांची विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी नेमणूक झाली. विमानतळावर दिवसाला 15 ते 16 हजार प्रवासी दाखल होत आहेत. तीन शिफ्टमध्ये तपासणीचे काम सुरू आहे. एका शिफ्टमध्ये 25 जण प्रवाशांची तपासणी करतात. त्यात डॉक्‍टर आणि पॅरामेडिकल स्टाफचा समावेश आहे. विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे "स्वॅब' तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविले जातात. 
 
क्वारंटाइनसाठी "टीम लीडर' 
जागतिक आपत्तीमध्ये कर्तव्य बजावत असताना डॉ. ढिकले हे मास्क, ग्लोव्हज अशा साऱ्या वैद्यकीय खबरदाऱ्या घेत आहेत. संसर्ग प्रसार रोखत स्पेन, इटलीसारखी स्थिती आपल्या देशात होऊ नये, अशी त्यांची भावना आहे. सेवन हिल्स रुग्णालयातील क्वारंटाइन केलेल्या प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या "टीम'चे डॉ. ढिकले प्रमुख आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःची काळजी घेत संशयित, रुग्णांची सेवा करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तपासणीविषयी डॉ. ढिकले म्हणाले, की "ए ग्रुप'मध्ये कोरोनाची लक्षणे, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि कोरोना रुग्णाशी संपर्क अशांचा समावेश होतो. "बी ग्रुप'मध्ये 60 वर्षांवरील, मधुमेहाचा त्रास होणारे येतात. "सी ग्रुप'मधील प्रवाशांना "होम क्वारंटाइन'साठी पाठविले जाते. 

कुटुंबीयांच्या आधारातून मिळते प्रोत्साहन 
डॉ. ढिकले यांच्या पत्नी चारुशीला अभियंता आहेत. त्यांचा मुलगा अवनीश (वय 5) नानावटी स्कूलमध्ये शिकतो. या दोघांना त्यांनी ऍड. तोरवणे यांच्याकडे पाठविले आहे. त्यांचे आई-वडील नाशिकला औरंगाबाद नाका भागात राहतात. रोज शुश्रूषेत व्यस्तता असली, तरीही वेळ मिळेल तसे कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत, तब्येत ठीक आहे, भोजन व्यवस्थित आहे, असा संवाद डॉ. ढिकले साधतात. त्यातून कुटुंबीय निर्धास्त होतात आणि आधार मिळतो. तर, त्यातून प्रोत्साहन मिळते, असे डॉ. ढिकले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी
 

सांगलीत पूरग्रस्तांसाठी सेवा 
कृष्णा नदीला आलेल्या पुरावेळी 14 ते 19 ऑगस्ट 2019 ला सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मुंबई महापालिकेतर्फे पाठविण्यात आलेल्या वैद्यकीय पथकातही डॉ. ढिकले यांचा समावेश होता. तेथेही त्यांनी सेवा दिली आहे. वीस डॉक्‍टरांचे पथक होते. या पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!