esakal | ''मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अमृत संस्थेचे मुख्यालय नाशिकमध्ये''
sakal

बोलून बातमी शोधा

chhaganbhujbal3.jpg

राज्यातील मागासवर्गीय युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने स्थापन होत असलेल्या ‘अमृत’ या संस्थेचे मुख्यालय नाशिक येथे होणार आहे. त्याचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ​

''मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अमृत संस्थेचे मुख्यालय नाशिकमध्ये''

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील मागासवर्गीय युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने स्थापन होत असलेल्या ‘अमृत’ या संस्थेचे मुख्यालय नाशिक येथे होणार आहे. त्याचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

पालकमंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश 

सरकारच्या निर्णयात अमृत संस्थेचे मुख्यालय नाशिकमध्ये होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध संस्था सुरू केल्या आहेत. त्यामध्ये मराठा व कुणबी समाजासाठी ‘सारथी’ संस्था असून, तिचे मुख्यालय पुणे येथे आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी ‘महाज्योती’ ही संस्था असून, तिचे मुख्यालय नागपूर येथे आहे. उर्वरित प्रवर्गासाठी असलेल्या ‘अमृत’ या संस्थेचे नियोजित मुख्यालय पुणे येथे होते. मात्र श्री. भुजबळ यांनी वेळोवेळी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा करून संस्थेचे मुख्यालय नाशिक येथे आणण्यात यश मिळविले आहे.

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना