RPF दीक्षांत समारंभ : भारतीय रेल्वे सुरक्षेसाठी पहिली मोठी तुकडी सज्ज; पाहा VIDEO

विनोद बेदरकर
Friday, 9 October 2020

यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 591 जवानांच्या तुकडीचे प्रशिक्षण होणार का? असा प्रश्न असताना केंद्राचे प्राचार्य आर. पी. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय खडतर व कठीण स्थितीत हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले.

नाशिक : देशातील क्रमांक दोनचे सुरक्षा दल असा लौकीक असलेल्या भारतीय रेल्वे सुरक्षा दलाची 591 जवानांची नवी तुकडी आज शुक्रवारी (ता. 9) रेल्वे सुरक्षेसाठी बाहेर पडली. आंध्रप्रदेश येथील ए. एन. नायर सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर शिन ओम शर्मा (उत्तर प्रदेश) यांनी मैदानी प्रकारात विजेतेपद राखले.   

रेल्वेची पहिली मोठी तुकडी...

नाशिकरोडला सामनगाव रोडवरील रेल्वे प्रशिक्षण केंद्रात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या दिक्षांत समारंभाला रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त अतुल पथक प्रमुख पाहुणे होते. रेल्वे सुरक्षा दलाची आजची नाशिकरोडहुन बाहेर पडलेली पहिली तुकडी आहे. त्यात 591 जवान आहे. देशात रेल्वे सुरक्षा दलाची एवढी मोठी तुकडी कधी बाहेर पडली नाही. त्यामुळे ही रेल्वेची पहिली मोठी तुकडी ठरली. नाशिक रोड तोफखाना केंद्र, महाराष्ट्र पोलीस अकादमी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सोबत रेल्वे सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिकला आहे. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 591 जवानांच्या तुकडीचे प्रशिक्षण होणार का? असा प्रश्न असताना केंद्राचे प्राचार्य आर. पी. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय खडतर व कठीण स्थितीत हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले. तुकडीत देशातील विविध 14 रेल्वे विभागाचे जवान सहभागी होते.

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

आद्यवत प्रशिक्षण           

प्रवाशी आणि रेल्वे संपत्तीचे रक्षण यासाठी कार्यरत असलेल्या या दलापुढे काल सुसंगत प्रशिक्षण आवश्यक झाले आहे. त्यामुळेच गती असलेल्या जवानांना संगणक, सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. - संजीव मित्तल (महाप्रबंधक, मध्य रेल्वे)

हेही वाचा > कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New detachment of Indian Railway Security Force 591 personnel nashik marathi news