माहेरी आलेल्या नवविवाहितेची निघाली अंत्ययात्रा; सुवासिनीच्या बातमीच्या धक्क्याने परिसरात शोक 

धनंजय वावधने
Thursday, 8 October 2020

नुकतेच लग्न झाले होते हर्षदाचे..नव्या संसाराची स्वप्ने घेऊन ती सुध्दा सासरी नांदायला गेली होती. पण त्यानंतर जे काही तिच्यासोबत घडले त्याने सासरचा एक एक क्षणही तिच्यासाठी मरणासमान होता. पण तरीदेखील केवळ आई-वडिलांसाठी ती निमुटपणे सारं काही सहन करत होती. काही दिवसातच ती माहेरी निघून आली..​

सोग्रस (जि.नाशिक) : नुकतेच लग्न झाले होते हर्षदाचे..नव्या संसाराची स्वप्ने घेऊन ती सुध्दा सासरी नांदायला गेली होती. पण त्यानंतर जे काही तिच्यासोबत घडले त्याने सासरचा एक एक क्षणही तिच्यासाठी मरणासमान होता. पण तरीदेखील केवळ आई-वडिलांसाठी ती निमुटपणे सारं काही सहन करत होती. काही दिवसातच ती माहेरी निघून आली..

माहेरी आलेल्या नवविवाहितेची निघाली अंत्ययात्रा

हर्षदा जितेंद्र सावंत (वय १९, रा. वाखारवाडी, ता. देवळा) या नवविवाहितेने काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने मंगळवारी तिला चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी उशिरा तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर हर्षदाचे पालक सुनील जाधव (रा. पुरी, ता. चांदवड) यांनी हर्षदाचा पती जितेंद्र सावंत, सासू मीनाबाई सावंत, दीर किशोर सावंत, जाऊ वैशाली सावंत (सर्व रा. वाखारवाडी) यांच्याविरोधात हर्षदाच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेऊन तिला मारहाण करणे, शिवीगाळ, उपाशीपोटी ठेवणे अशा पद्धतीने शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच माहेरून कार घेण्यासाठी तीन लाख रुपये आणावेत, अशी वेळोवेळी जबरदस्ती करत होते. या छळास कंटाळून हर्षदा माहेरी आली असताना तिने काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी हर्षदाचा पती आणि सासू, दीर व जाऊ यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा 

माहेरून  तीन लाख रुपये आण

हर्षदाच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेऊन तिला मारहाण करणे, शिवीगाळ, उपाशीपोटी ठेवणे अशा पद्धतीने शारीरिक व मानसिक छळ करणे, तसेच माहेरून कार घेण्यासाठी तीन लाख रुपये आणावेत, अशी वेळोवेळी जबरदस्ती करत होते.शवविच्छेनानंतर बुधवारी सकाळी अकराला तिचा मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आला.

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
पुरी (ता. चांदवड) येथील नवविवाहिता हर्षदा जितेंद्र सावंत हिने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.६) सायंकाळी घडली. बुधवारी (ता. ७) सकाळी साडेअकराला पुरी येथील स्मशानभूमीत तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly married woman commit suicide nashik marathi news