जितके कोरोना बाधित तितक्यांचीच मात! एका दिवसात आढळलेल्‍या संशयितांचा हा तर सर्वोच्च आकडा...

अरुण मलाणी
Thursday, 30 July 2020

अन्‍य विविध भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू असल्‍याने याचा परिणाम म्‍हणून संशयित रुग्‍णांच्‍या संख्येत पुन्‍हा एकदा वाढ झालेली आहे. बुधवारी (ता. २९) दिवसभरात एक हजार ६०६ संशयित आढळून आले असून, एका दिवसात आढळलेल्‍या संशयितांचा हा सर्वोच्च आकडा आहे

नाशिक : अन्‍य विविध भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू असल्‍याने याचा परिणाम म्‍हणून संशयित रुग्‍णांच्‍या संख्येत पुन्‍हा एकदा वाढ झालेली आहे. बुधवारी (ता. २९) दिवसभरात एक हजार ६०६ संशयित आढळून आले असून, एका दिवसात आढळलेल्‍या संशयितांचा हा सर्वोच्च आकडा आहे

दिवसभरात ५०९ रुग्‍णांची कोरोनावर मात

कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असली तरी बुधवारी (ता. २९) दिवसभरात ५०९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या दहा हजारांहून अधिक झाली आहे. आतापर्यंत दहा हजार २८० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात नव्‍याने ५३६ रुग्‍ण जिल्‍हाभरात आढळल्‍याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजार २६३ झाला आहे. बारा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू असून, आतापर्यंत ४८४ रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात सोळाशे संशयित रुग्‍णालयात दाखल झालेत. 

हेही वाचा > घरखर्च भागविण्यासाठी वडिलांसोबत लावले पिको-फॉल...भाग्यश्रीच्या यशाने आईच्या कष्टाला कोंदण! 

बारा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू, सोळाशे संशयित दाखल 
शहरातील जेल रोड आणि सातपूर येथील प्रत्येकी दोन, तर पिंपळगाव बहुला, टागोरनगर, लक्ष्मीनगर, कामगारनगर, हिरेनगर, नाशिक रोड, त्रिमूर्तीनगर परिसरात प्रत्येकी एक अशा एकूण अकरा रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. नंदुरबार येथील एका रुग्‍णाचादेखील कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. दरम्‍यान, दिवसभरात आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांपैकी तब्‍बल ३३१ रुग्‍ण नाशिक शहरातील आहेत. तर १४७ रुग्‍ण नाशिक ग्रामीण, २१ रुग्‍ण मालेगाव, तर एक जिल्‍हाबाह्य आहे. 

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

एका दिवसात आढळलेल्‍या संशयितांचा सर्वोच्च आकडा
सध्या नाशिक शहर परिसरात, तसेच अन्‍य विविध भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू असल्‍याने याचा परिणाम म्‍हणून संशयित रुग्‍णांच्‍या संख्येत पुन्‍हा एकदा वाढ झालेली आहे. बुधवारी (ता. २९) दिवसभरात एक हजार ६०६ संशयित आढळून आले असून, एका दिवसात आढळलेल्‍या संशयितांचा हा सर्वोच्च आकडा आहे. यापैकी नाशिक शहरातील एक हजार ११२ रुग्‍ण असून, १९३ रुग्‍ण नाशिक ग्रामीण, २७ मालेगाव महापालिका, तर २७४ रुग्‍ण गृहविलगीकरणात ठेवले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तब्‍बल ९६१ अहवाल प्रलंबित होते

रिपोर्ट - अरुण मलाणी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about corona suspected in nashik marathi news