ग्रामपंचायत रणधुमाळी : नाशिक विभागातील २२१२ ग्रामपंचायतींत प्रचाराचा तोफा थंडावल्या; उद्या मतदान 

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Thursday, 14 January 2021

उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांतील मुदत संपलेल्या दोन हजार ४७६ ग्रामंचापतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांतील मुदत संपलेल्या दोन हजार ४७६ ग्रामंचापतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाजावर व निवडणुकांवर होणारा खर्च वाचला आहे.

उमराणे (जि. नाशिक) व खोंडामळी (जि. नंदुरबार) या दोन ग्रामपंचायती वगळता उर्वरित दोन हजार २१२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शुक्रवारी (ता.१५) होत असून, बुधवारी (ता.१३) प्रचाराचा तोफा थंडावल्या. १८ जानेवारीला मतमोजणी होईल. 

सात हजार ७६१ मतदान केंद्रांवर मतदान

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत मिळून ३७ निवडणूक निरीक्षक यांच्या तालुकानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पाच जिल्ह्यांत मिळून सहा समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे निरीक्षक निवडणूक प्रक्रियेची तपासणी करतील. विभागातील सात हजार ७६१ मतदान केंद्रांवर कर्मचारी व अधिकारी नजर ठेवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन होते की नाही, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे की नाही, आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, यावर निरीक्षण करणार आहेत. विभागात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पाचही जिल्ह्यांत विभागात समन्वय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे कामकाज विभागात सुरू असून, शासनाला ते नित्याने अहवाल देत आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

नाशिक विभागात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा 
------------------------------------------------------- 
जिल्ह्याचे नाव---निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या--- बिनविरोध----मतदान केंद्र संख्या 
- नाशिक--------------६२१---------------------५५-------------१९५५ 
- धुळे-----------------२१८----------------------३६---------------६२६ 
- नंदुरबार-------------८७---------------------२३----------------२१२ 
- जळगाव------------७८३----------------------९२---------------२४१५ 
- नगर---------------७६७------------------५६---------------२५५३ 
एकूण---------------२४७६------------------२६२---------------७७६१  

 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about gram panchayat elections in nashik division marathi news