महिला सरपंचपद आरक्षणांसाठी उद्या सोडत; ५० टक्के आरक्षणाकडे उमेदवारांच्या नजरा 

विनोद बेदरकर
Wednesday, 27 January 2021

निवडणूक निकालानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे. महिला सरपंच पदासाठी उद्या गुरुवारी (ता.28) महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणाची सोडत नाशिकला जिल्हा नियोजन भवनात होणार आहे. 

नाशिक :  ग्रामपंचायत निवडणूकीची रणधूमाळी संपली पण गावचा कारभारी कोण होणार याचा निर्णय मात्र अजून होणे बाकी आहे. निवडणूक निकालानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे. महिला सरपंच पदासाठी उद्या गुरुवारी (ता.28) महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणाची सोडत नाशिकला जिल्हा नियोजन भवनात होणार आहे. 

1995 च्या आरक्षणानुसार सरपंचपदाचे आरक्षण

जिल्ह्यात 621 ग्रामपंचायतीसाठी नुकत्याच निवडणूका झाल्या असून, 2025 पर्यतच्या मुदत संपणाऱ्या निवडणूकांचे आरक्षण स्थिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र सरपंच पदाचे आरक्षण मात्र जाहीर झालेले नाही. गेल्या वर्षभरातील लाॅकडाउन आणि सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी 1995 च्या आरक्षणानुसार सरपंचपदाचे आरक्षण काढावे अशी मागणी करीत आम आदमी पक्षाने निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार पदाचे आरक्षण काढले जाणार आहे. 

 हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

तालुक्यात सोडती 

ग्रामपंचायती्च्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत प्रत्येक तालुक्यातील तहसिल कार्यालयात सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडती निघणार आहे. मात्र त्यापूर्वी जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायतीपैकी 50 टक्के महिला आरक्षणासाठी मात्र जिल्ह्यातील सगळ्या सोडती जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. सकाळी 
नियोजन भवन सभागृहात ही सोडत होणार आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about sarpanch post woman reservation Nashik Marathi news