पद मिळूनही साधा उल्लेखही नाही! शिवसेनेत महानगरप्रमुखपदाचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा 

प्रमोद दंडगव्हाळ
Sunday, 24 January 2021

सिडकोतील शिवसेनेच्या एका राजकीय मुत्सद्दी म्हणून संपूर्ण शहराला ओळख असलेल्या नगरसेवक महोदयांना शिवसेना पक्षातील सर्वांत ‘हेवीवेट’ पद म्हणून ओळखल्या जाणारे महानगरप्रमुखपद मिळूनही त्यांच्या या पदाचा साधा उल्लेखही त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर नाही...

सिडको (जि. नाशिक) : एकेकाळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या ज्वलंत विचारांनी अख्ख्या महाराष्ट्रातील तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. या धगधगत्या भगवेमय वातावरणात शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदालाही त्या वेळी अनन्यसाधारण महत्त्व होते. हेच शिवसेना शाखाप्रमुख भविष्यात नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री झाल्याचे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला ‘याचि देही, याचि डोळा’ बघायला मिळाले. परंतु, सध्या पदांचे महत्त्व कमी झाले की काय, असा प्रश्‍‍न निर्माण होऊ लागला आहे.

शिनसैनिकांत चर्चा

सिडकोतील शिवसेनेच्या एका राजकीय मुत्सद्दी म्हणून संपूर्ण शहराला ओळख असलेल्या नगरसेवक महोदयांना शिवसेना पक्षातील सर्वांत ‘हेवीवेट’ पद म्हणून ओळखल्या जाणारे महानगरप्रमुखपद मिळूनही त्यांच्या या पदाचा साधा उल्लेखही त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर असू नये, याबाबत त्यांना भेटीसाठी व कामानिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिक व शिवसैनिकांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील महानगरप्रमुख या पदाचे महत्त्व कमी झाले की काय, अशा प्रकारची चर्चा यानिमित्ताने शिवसैनिकांत ऐकायला मिळत आहे.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Shivsena city chief post nashik marathi news