शेतकऱ्यांनो प्राण्यांपासून पीक संरक्षणाची चिंताच सोडा! भऊरच्या भूमिपुत्राचा भन्नाट 'अविष्कार'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

भूमिपुत्र नीलेश ऊर्फ विनोद पवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन ‘फायर बार’ नावाचे यंत्र तयार केले. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे असे हे यंत्र आहे. या यंत्राद्वारे पीक संरक्षण होण्यास मदत होणार आहे. वाचा सविस्तर बातमी

नाशिक : (भऊर) येथील भूमिपुत्र नीलेश ऊर्फ विनोद पवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन ‘फायर बार’ नावाचे यंत्र तयार केले. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारे असे हे यंत्र आहे. या यंत्राद्वारे पीक संरक्षण होण्यास मदत होणार आहे. वाचा सविस्तर बातमी

भऊरच्या भूमिपुत्राचा अविष्कार

शेतकऱ्यांच्या पिकांचे बऱ्याचदा वन्यजीव नुकसान करतात. जसे, बाजरीच्या पिकाचे पाखरं नुकसान करतात. मका, भुईमुगाचे रानडुक्कर, जंगली प्राणी नुकसान करतात. या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत अतिशय कमी खर्चात नीलेश पवार यांनी हे यंत्र तयार केले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक अडीचचा पाइप, एक बंद बूच, एक लाईटर, एक रेडूसर, एक सव्वाचा पाइप. हे यंत्र शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरत असून, यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो. कमी वेळात शेतकरी आपल्या पिकाचे चांगल्या प्रकारे रक्षण करू शकतो. यापूर्वीही पवार यांनी अंडी उबवणी यंत्र तयार केले होते. कोंबडीशिवाय पिलं जन्माला येत नाही. पण त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता.  

हेही वाचा > कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Pawar made a crop protection device from animals nashik marathi news