सणासुदीसाठी नऊ उत्सव विशेष एक्स्प्रेस! गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची सुविधा

अंबादास शिंदे
Tuesday, 20 October 2020

आगामी सण, उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक रोड / भुसावळ : आगामी सण, उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 

सणासुदीसाठी नऊ उत्सव विशेष एक्स्प्रेस 

यात लोकमान्य तिलक टर्मिनस- गोरखपूर सुपर फास्ट विशेष गाडी (डाउन क्रमांक - ०२१६५) २२ ऑक्टोबर पासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवार, सोमवारला प्रस्थान स्टेशनहून ०६.२३ ला प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी ११.२५ ला गोरखपूर स्टेशनला पोचेल. गोरखपूर-लोकमान्य तिलक टर्मिनस सुपर फास्ट विशेष गाडी (अप, क्रमांक ०२१६६) ही २३ ऑक्टोबरपासून ते १ डिसेंबरपर्यंत दर शुक्रवार, मंगळवारी दुपारी १५.४५ ला प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी २१.३० ला लोकमान्य तिलक टर्मिनस स्टेशनला पोचेल. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, जंघई, भदोयी, वाराणसी, मऊ, देवरिया येथे थांबेल. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

वाढती गर्दी कमी करण्यासाठी प्रवाशांसाठी सुविधा 
नागपूर-मडगाव विशेष गाडी (अप क्रमांक- ०१२३५) २३ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी दुपारी १६.०० ला प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १६.४० ला मडगाव स्टेशनला पोचेल. मडगाव- नागपूर विशेष गाडी (डाउन क्रमांक ०१२२६) ही २४ पासून ते ७ नोव्हेबरपर्यंत दर शनिवारी सायंकाळी १९.४० ला प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी २०.३० ला नागपूर स्टेशनला १६.४० ला पोचेल. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकावली, सिंधुदुर्ग, कुडाल, सावंतवाडी रोड, थिवंम, करमाली येथे थांबेल. केवळ आरक्षण असलेल्याच प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये परवानगी असेल.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine special express for the festival nashik marathi news