मौल्यवान निर्णयानी जिंकलं सैनिकांचं मन! स्वत:चं स्त्रीधन देऊन केलं लाख मोलाचं काम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

देशसेवेसाठी निडरपणे आपले सैनिक सीमांचे रक्षण करतात. त्या सैनिकांचे हात बळकट करणे व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदरभाव वेळोवेळी दाखवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच.

नाशिक : महिलांनो...आदर्श घ्या. सोनं जीवापाड जपतात अन् मिरवतात देखील. मात्र डॉ. निशिगंधाताई मोगल यांच्यासारखी आदर्श स्त्री लाखात एकच. स्त्री पारंपारिकतेला मागे टाकत सोन्याहून अधिक मौल्यवान निर्णय मोगल यांनी घेतला आहे. आपल्या कृतीतून त्यांनी कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे. 

असं देशाप्रती प्रेम लाखात एकच...

देशसेवेसाठी निडरपणे आपले सैनिक सीमांचे रक्षण करतात. त्या सैनिकांचे हात बळकट करणे व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदरभाव वेळोवेळी दाखवून देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच. असंच काहीसं माजी आमदार डॉ. निशिगंधाताई मोगल यांचा मनात आलं. त्यानंतर पक्का निर्धार उराशी बाळगूण त्यांनी तशी प्रक्रीया सुरु केली. त्यांचा कुटुंबियांनी देखील यासाठी परवानगी दिली. त्यामुळे शहीदांच्या वीरपत्नी, दिव्यांग जवान, माजी सैनिकांसह जवानांच्या कल्याणकारी कामांसाठी भारतीय सेनेच्या ध्वजनिधीमध्ये मोगल यांनी आपले दागिन्यांच्या माध्यमातून वीस लाखांची मदत भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडे पाठविली. मात्र सैनिक कल्याण मंडळ सोने किंवा तत्सम वस्तू स्विकारत नाही, असे त्यांना कळविण्यात आले. मग त्यांनी हे सोने सराफाकडे दिले. त्याचे मुल्य वीस लाख रुपये होते. हे वीस लाख रुपये त्यांनी भारतीय सैन्यासाठी दिले. निशिगंधा यांनी ही वेगळे वाट निवडून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

निशिगंधा मोगल म्हणतात...

कारगील युध्दापासून मी मनात निश्चय केला होता. पाच वर्षांपुर्वी जेव्हा मी कारगीलला प्रत्यक्ष भेट दिली, तेव्हा तर काळजात धस्स् झाले. इतक्या भयावह परिसरात जवानांनी झुंज देत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे यावर्षी मी भारतीय सेनेला सुमारे ५५ तोळे सोन्याच्या दागिण्यांद्वारे २० लाखांची मदत दिली. सेनेचे मिळाले आभारपत्र वाचून मनाला समाधान होत आहे. भारतीय सेना व त्यांचे कुटुंबीय आपल्यासाठी जो त्याग करत देशसेवा बजावतात, त्यापुढे ही मदतदेखील क्षुल्लकच आहे, असे मी मानते.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nishigandha Mughal donated Rs. 20 lakhs to the Indian Army nashik marathi news