#Fightagainstcorona : नाशिकमध्ये अद्यापही "नो कोरोना'च..411 होम क्वारंटाइन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूची लागण जागतिक संसर्गग्रस्त घोषित केले असून, दहा देशांमधील नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, नागरिक हे शिक्षण, नोकरी व उद्योगानिमित्त परदेशात आहेत. अनेक उद्योजक, व्यावसायिकही सातत्याने परदेश दौऱ्यांवर असतात. त्यामुळे विविध देशांतून जिल्ह्यात आतापर्यंत 517 नागरिक दाखल झालेले आहेत. यात, कोरोनाग्रस्त देशांतील 278 नागरिकांचा सामावेश आहे.

नाशिक : जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. ही बाब नाशिकच्या दृष्टीने सर्वाधिक दिलासादायक आहे. परदेशातून आलेल्या 517 नागरिकांपैकी 411 जण होम क्वारंटाइन आहेत, तर गेल्या 24 तासांमध्ये 33 जण परदेशातून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, बुधवारी (ता. 25) दोघा कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेले असून, शुक्रवारी (ता. 27) त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे.

दहा देशांमधील नागरिकांवर विशेष लक्ष

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूची लागण जागतिक संसर्गग्रस्त घोषित केले असून, दहा देशांमधील नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी, नागरिक हे शिक्षण, नोकरी व उद्योगानिमित्त परदेशात आहेत. अनेक उद्योजक, व्यावसायिकही सातत्याने परदेश दौऱ्यांवर असतात. त्यामुळे विविध देशांतून जिल्ह्यात आतापर्यंत 517 नागरिक दाखल झालेले आहेत. यात, कोरोनाग्रस्त देशांतील 278 नागरिकांचा सामावेश आहे. उर्वरित अन्य देशांतून आले आहेत. परदेशातून आलेल्या 517 नागरिकांपैकी 411 नागरिक 14 दिवस होम क्वारंटाइन आहेत, तर 106 जणांचे 14 दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झालेले आहे, तसेच आतापर्यंत कोरोना संशयित 60 रुग्णांचे स्वॅब तपासण्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असता, त्या साऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत.

हेही वाचा >PHOTOS : "बापरे! जर्मन नागरिकांचे नाशिकमध्ये काय काम?" नागरिकांमध्ये अचानक खळबळ

परदेशातून 33 नागरिक शहरात

बुधवारी दाखल असलेल्या दोघा कोरोना संशयितांच्या स्वॅबचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले असून, त्यांचाही यात समावेश आहे. या दोघांना शुक्रवारी डिस्चार्ज दिला जाणार आहे. गुरुवारी (ता. 26) नव्याने एकही कोरोना संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालय, नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय वा मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल झालेला नाही. ही बाब नाशिक आरोग्य विभागाच्या दृष्टीने दिलासादायक मानली जात आहे. -- गुरुवारी दाखल झालेले नागरिक यूएई- 6, सौदी- 3, अमेरिका- 1, इटली- 0, जर्मनी- 0, इंग्लंड- 3, इराण- 0, चीन- 0, अन्य देश- 20, एकूण ः 33.

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No corona patient in nashik marathi news