पुरवठामंत्र्यांच्याच जिल्ह्यातील अशी स्थिती! दिवाळी तोंडावर असतानाही गरीबांना मोफतचे धान्य नाहीच

युनूस शेख
Monday, 2 November 2020

दिवाळी तोंडावर असताना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या मोफतच्या धान्यापासून गोरगरिबांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. सणासुदीमुळे लाभार्थी दुकानांत चकरा वाढल्या असताना, दुकानदारांनी मोफत धान्य आले नसल्याचे फलक दुकानाबाहेर झळकले आहेत. राज्याचे अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यातील ही स्थिती आहे. 

नाशिक : दिवाळी तोंडावर असताना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या मोफतच्या धान्यापासून गोरगरिबांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. सणासुदीमुळे लाभार्थी दुकानांत चकरा वाढल्या असताना, दुकानदारांनी मोफत धान्य आले नसल्याचे फलक दुकानाबाहेर झळकले आहेत. राज्याचे अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यातील ही स्थिती आहे. 

सणासुदीत मोफतचे धान्य नाही 

लॉकडाउनच्या काळात नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी सरकारकडून नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवरील हक्काच्या धान्यासह मोफत धान्य देण्याच्या भरपूर घोषणा झाल्या. मात्र त्याचे वाटप सरसकट न ठेवता आधी तहसीलदारांना अर्ज करून त्यानंतरच दुकानातून मोफत धान्य दिले जात आहे. लॉकडाउनच्या काळात अन्य काही नाही, तर कमीत कमी पोटभर जेवण तर त्यामुळे मिळाले. नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार असल्याचे सरकारतर्फे घोषित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ऑक्टोबरचे मोफतचे धान्यही स्वस्त धान्य दुकानात आले नाही. लाभार्थ्याना त्यामुळे धान्य मिळाले नाही. दैनंदिन त्यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानात चकरा मारून धान्य आले की नाही, याची चौकशी सुरू आहे. काही नागरिक दुकानादारांसह वाद घालत आहेत. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

सणासुदीच्या तोंडावर फलक 
मोफत धान्य घेऊन लाभार्थ्यांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासास कंटाळून शेवटी दुकानदारांनी दुकानाबाहेर फलक लावून मोफतचे धान्य आले नसल्याचे फलक लावले आहेत. दिवाळी अवघ्या १० ते १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा वेळी धान्याची खरी आवश्‍यकता होती. परंतु सणासुदीच्या दिवसांतच मोफत धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यामध्ये बरेच लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा मोठा वर्ग आहे. तर दुसरीकडे लॉकडाउनच्या परिणामातून अजूनही बरेच कुटुंब सावरले नाही. अशा कुटुंबांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडून याबाबत पावले उचलून सणासुदीत तरी धान्य उपलब्ध होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no free food for poor people during festival nashik marathi news

टॉपिकस