बाजारपेठांमध्ये ‘नो मास्क, नो एन्ट्री’! दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांच्या दुकानदारांना सूचना 

विक्रांत मते
Monday, 26 October 2020

मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बाजारपेठांमध्ये विभागीय स्तरावर पोलिसांच्या मदतीने गस्ती पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक : विजयादशमीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत झालेली गर्दी व त्यातून कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाल्यानंतर आता दिवाळीतही बाजारपेठेत गर्दी होणार असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू नये, म्हणून आयुक्त कैलास जाधव यांनी शहर व उपनगरांमधील बाजारपेठांमधील दुकानांमध्ये ‘नो मास्क नो एन्ट्री’ असा दंडक घालून दिला आहे.

गस्ती पथक नियुक्त करणार

मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बाजारपेठांमध्ये विभागीय स्तरावर पोलिसांच्या मदतीने गस्ती पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलमध्ये गोविंदनगर भागात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांमध्ये वाढ होत गेली. मेअखेरपासून कोरोनासंसर्ग वाढत गेला. पन्नास हजारी पार गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये हजारांच्या पटीने रुग्णांची संख्या वाढली. एप्रिलमध्ये महापालिकेने सोशल डिस्टन्सिंगचा नियम घालून दिला. परंतु तरीही बाजारपेठेतील गर्दी कमी झाली नाही. रुग्णसंख्या वाढत गेली त्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येचा मृत्युदर खालावला. 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

सर्वांनाच मास्क बंधनकारक

दिवाळीमुळे बाजारपेठेत पुन्हा गर्दी झाल्याने चिंता निर्माण झाली. हिवाळ्याला सुरवात झाल्याने या काळात कोरोनाची दुसरी लाट शहरात निर्माण होण्याची भीती आहे. गर्दीमुळे नागरिकांकडूनच हातभार लागण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीमुळे ही गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने दसऱ्याप्रमाणे गर्दीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता बाजारपेठांमध्ये ‘नो मास्क नो एन्ट्री’ असा दंडक घालून देण्यात आला. विभागीयस्तरावर भरारी पथकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. मास्क परिधान न करणाऱ्यांवर जागेवरच दंड वसूल केला जाणार आहे. ज्या दुकानांमध्ये ग्राहक जाईल, त्या दुकानदारांसह सर्वांनाच मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय दुकानावर पाटी लावावी लागणार आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

दुकानांमध्ये ‘नो मास्क, नो एन्ट्री’चा फलक लावणे बंधनकारक आहे. सॅनिटाइझरची व्यवस्था करावी लागेल. भरारी पथके यावर नजर ठेवतील. मास्क नसल्यास ग्राहकांसह दुकानदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 
- कैलास जाधव, आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no mask no entry in shops nashik marathi news