डेंगी, मलेरियाचे आता संकट नको;  महापौरांकडून औषधफवारणीच्या सूचना 

विक्रांत मते
Wednesday, 5 August 2020

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डेंगी, मलेरिया या आजारांचे नवे संकट ओढावले जाऊ नये म्हणून नियमित औषध फवारणी व नाल्यांची साफसफाई करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. ४) अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. 

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डेंगी, मलेरिया या आजारांचे नवे संकट ओढावले जाऊ नये म्हणून नियमित औषध फवारणी व नाल्यांची साफसफाई करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. ४) अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या. 

कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न सरू

महापौरांच्या रामायण निवासस्थानी श्री. कुलकर्णी यांनी बैठक घेतली. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न सरू आहेत. त्याचबरोबर आता डेंगी, मलेरियाची साथ पसरू नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे औषध फवारणी करावी, नाल्यांमध्ये विशेषतः फवारणीकडे लक्ष द्यावे, नवीन इमारतींमध्ये औषध फवारणी करावी, पाणी साचत असेल तेथे उपाययोजना करावी, नवीन बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, शहरात प्रभागनिहाय स्वच्छता निरीक्षक, मुकादम नियुक्त करावे, रस्त्यांची साफसफाई करण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी दिल्या.

हेही वाचा > जेव्हा साधु महाराजांच्या कुटियाच्या आवारातच घडतो धक्कादायक प्रकार...पोलीसांनी केला खुलासा

सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे साहित्य पुरवावे, घंटागाडीचे नियोजन करावे, भाजी मार्केट परिसरासाठी स्वतंत्र गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. कोरोना नियंत्रणासाठी रॅपिड तपासण्या करण्याचा सूचना दिल्या. उपायुक्त विजय पगार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, डॉ. अजिता साळुंखे, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, उपायुक्त विजय पगार, करुणा डहाळे, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईंकाकडून रुग्णालयाची तोडफोड....काय घडले नेमके? सीसीटिव्हीतून उघड

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No more dengue, malaria crisis; Drug spraying instructions from the mayor nashik marathi news