आनंदवार्ता! उत्तर महाराष्ट्रात चक्क २५ हजार रुग्णांचा कोरोनावर विजय... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

दिवसेंदिवस आजारावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून, लोकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व रोग होण्यापूर्वीच स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे. नाशिक रोडच्या महसूल आयुक्त कार्यालयात यासंबंधी रोज माहिती अद्ययावत केली जात असून, रुग्ण बरे होणाऱ्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नाशिक / नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील 24 हजार 945 रुग्णांनी कोरोनावर मात करून विजय मिळविला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये सध्या 13 हजार 827 लोक निरीक्षणाखाली, तर 31 हजार 553 लोक उपचार घेत असून, 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सध्या कोरोनाविषयी समाजात असणारे गैरसमज कमी
सध्या औषधांबरोबरच गुणवत्तापूर्ण आहार, आत्मविश्‍वास, शासकीय यंत्रणेने घेतलेली काळजी व निष्णात डॉक्‍टर यांच्यावर विश्‍वास ठेवून नाशिक जिल्ह्यात 13 हजार 770, नंदुरबार जिल्ह्यात 179, जळगाव जिल्ह्यात सात हजार 670, धुळे जिल्ह्यात 165, तर नगर जिल्ह्यात तीन हजार 161 लोकांनी कोरोनावर मात करून विजय मिळविला आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे सध्या कोरोनाविषयी समाजात असणारे गैरसमज कमी होत आहेत. पाचही जिल्ह्यांमध्ये मृतांचा आकडा अतिशय अत्यल्प असून, नाशिक जिल्हा 122, नंदुरबार जिल्ह्यात तीन, जळगाव जिल्ह्यात 140, धुळे जिल्हात 38, तर नगर जिल्ह्यात नऊ, असे एकूण 312 कोरोनाग्रस्तांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी,
सध्या मृत्युदर जळगाव जिल्ह्यात अधिक असून, लोक काळजी न घेता बेपर्वाईने वागत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 
उत्तर महाराष्ट्रात सध्या 13 हजार 827 लोक निरीक्षणाखाली आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यात पाच हजार 777, नंदुरबार जिल्ह्यात एक हजार 580, जळगाव जिल्ह्यात तीन हजार 838, धुळे जिल्ह्यात एक हजार 83, नगर जिल्ह्यात एक हजार 549 लोक निरीक्षणाखाली आहेत.

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

दिवसेंदिवस आजारावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून, लोकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व रोग होण्यापूर्वीच स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे. नाशिक रोडच्या महसूल आयुक्त कार्यालयात यासंबंधी रोज माहिती अद्ययावत केली जात असून, रुग्ण बरे होणाऱ्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या 31 हजार 553 लोक रुग्णालयात कोरोनाशी मुकाबला करीत आहेत.  

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In North Maharashtra, about 25,000 patients won over Corona nashik marathi news