कुटुंब सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना नोटिसा 

विक्रांत मते
Friday, 2 October 2020

कोरोनाच्या प्रतिकारासाठी राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला महापालिका हद्दीत सुरवात झाली असून, मोहिमेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नाशिक : कोरोनाच्या प्रतिकारासाठी राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेला महापालिका हद्दीत सुरवात झाली असून, मोहिमेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करताना सेविकांना सुरक्षिततेची साधने मिळत नाही. अनेकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, पन्नासपेक्षा अधिक वय असल्याने कामे देऊ नये, अशी मागणी अंगणवाडी सेविकांची होती. मात्र त्यानंतरही सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली. पंचवटी व पश्‍चिम विभागात २९ सप्टेंबरच्या सर्वेक्षणास गैरहजर राहिल्याने पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

कोरोना संसर्ग झालेल्या सेविकांना वैद्यकीय मदत नाही

दरम्यान, महापालिकेच्या कारवाईनंतर अंगणवाडी सेविकांनी कामास सुरवात केली. परंतु प्रशासनाला लेखी उत्तरदेखील दिले. सुरक्षिततेसाठी वैद्यकीय विमा काढला नाही. कोरोना संसर्ग झालेल्या सेविकांना वैद्यकीय मदत मिळाली नाही. उलट मानधनातून कपात करण्यात आल्याची आठवण करून दिली. दरम्यान, शहरात ७९४ पैकी ६३२ पथकांद्वारे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ५५ हजार ४१४ घरांना भेटी देताना दोन लाख २९ हजार ९१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ६०४ संशयित आढळले. त्यांचे स्वॅब तपासल्यानंतर त्यात ३४४ करोनाबाधित आढळले. 

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Anganwadi workers who refuse family survey nashik marathi news