टवाळखोरांनो आता सावधान! कारण 'ते' येतील अन् काढतील धिंड..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

त्यांच्याच परिसरात त्यांची धिंडदेखील काढण्यात येणार आहे. आपल्या परिसरात अशा प्रकारे दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजय खरात व सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी केले आहे.

नाशिक/ सिडको : लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर शहर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोरांविरोधात "अँटी गुंडा स्कॉड'ची निर्मिती करण्यात येणार आहे. अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते "अँटी गुंडा स्कॉड' पथक तयार करणार आहेत.

दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांविरोधात होणार कारवाई

या पथकात विशेष प्रशिक्षित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून विभाग दोनमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पथके नेहमी फिरतीवर असतील. चौकाचौकांत तसेच विशिष्ट ठिकाणी घोळका करून दहशत माजविणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा टवाळखोर, गुंडांची त्यांच्याच परिसरात धिंडदेखील काढण्यात येणार आहे. आपल्या परिसरात अशा प्रकारे दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलिस उपायुक्त विजय खरात व सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी केले आहे.

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now against the crime "Anti Punk Squad" will run by nashik police marathi news