esakal | काय सांगता...आता नाशिकचेही सफरचंद खायला मिळणार?...कसे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Apple-farm.jpg

फळबाग लागवडीत हा भाग नेहमीच अग्रेसर असतो. येथील फळबाग उत्पादक बाळासाहेब देवरे यांनी त्यांच्या शेतीत आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे अशी विविध प्रकारची फळशेती फुलवली आहे. या दरम्यान त्यांनी सफरचंद पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला. 

काय सांगता...आता नाशिकचेही सफरचंद खायला मिळणार?...कसे ते वाचा

sakal_logo
By
मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवळा : भारताच्या भूमीतील स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू - काश्‍मीरमध्ये पिकणारे टवटवीत सफरचंद आपल्या सर्वांच्याच तोंडाला पाणी आणतात... अहो पण स्वर्गातले हे फळ आता नाशिक जिल्ह्यातही पिकू लागलं आहे...काय विश्‍वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. देवळ्या सारख्या दुष्काळी तालुक्‍याच्या भागात द्राक्ष आणि डाळींबापाठोपाठ आता सफरचंदाचीही बाग फुलली असून लवकरच आता आपणास नाशिकचे सफरचंद खाण्यास मिळाल्यास आश्‍चर्य वाटायला नको....

विविध प्रकारची फळशेती 

स्वप्नवत वाटणाऱ्या सफरचंदची बाग वाजगाव (ता. देवळा) येथील देवरे कुटुंबीयांनी उभी केली आहे. देवरे कुटुबांचे प्रमुख प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब देवरे यांनी आपल्या शेतात सफरचंदाची फळबाग फुलवत सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यामुळे आता द्राक्ष - डाळिंबासोबतच सफरचंदाच्या बागाही फुलण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. डाळींबाचे आगार म्हणून वाजगाव परिसराची ओळख आहे. फळबाग लागवडीत हा भाग नेहमीच अग्रेसर असतो. येथील फळबाग उत्पादक बाळासाहेब देवरे यांनी त्यांच्या शेतीत आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, डाळिंब, द्राक्षे अशी विविध प्रकारची फळशेती फुलवली आहे. या दरम्यान त्यांनी सफरचंद पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला. 

आता फळे लगडू लागली 

त्यांनी जून 2019 मध्ये जम्मू येथून हरमन 99 जातीच्या सफरचंदाची रोपे आणत दहा बाय दहा अंतरावर लागवड केली. आजूबाजूला वृक्षराजी व नारळाची बाग असल्याने थंड हवामान मिळत गेले. सेंद्रिय खते, जैविक कीटकनाशक यांचा वापर करत ही बाग फुलवली. त्यातील काही झाडांना आता फळे लगडू लागली आहेत. आगामी काळात या फळधारणेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याने चांगली उत्पादकता मिळणार, असा विश्वास देवरे कुटुंबीयांनी "सकाळ' शी बोलतांना व्यक्त केला. सध्या बागेत दोनशे झाडे आहेत. या फळबागेसाठी तज्ञांची मते जाणून घेतली जात आहेत. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

भाकड गाईंचेही संगोपन 

श्री. देवरे यांनी त्यांच्या शेतात नारळाची सव्वा दोन हजार झाडे लावली आहेत. इतर फळझाडांची संख्याही इतकीच आहे. पारंपारिक पिकांऐवजी नवनवीन शेतीपिके करण्याकडे कल यामुळे देवरेंच्या या फळबागा व आदर्श शेती व्यवस्थापन पाहण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी यांच्या कृषीसहली चालू झाल्या आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब हे स्वतः भाकड गाईंचेही संगोपन करतात.

उत्साह वाढवणारी बाब

पारंपारिक शेती न करता फळबाग लागवडीचे प्रयोग करण्याची आवड आहे. सध्या सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. या सफरचंदच्या झाडांना फळधारणा झाली आहे ही आमच्यासाठी उत्साह वाढवणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..