आता मार्गिका क्रमांकानुसार धावणार शहर बस! नाशिक रोड, तपोवन डेपो ठरणार महत्त्वाचे

bus yeola.jpg
bus yeola.jpg

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करताना शहरात अद्यापपर्यंत बससेवा पोचली नाही त्या नवनगरांना सामावून घेण्यासाठी नवीन मार्गिका आखण्यात आल्या आहेत. नाशिककरांना शहर बसने प्रवास करण्यासाठी आता मुंबई, ठाणेप्रमाणेच स्थळाऐवजी क्रमांकानुसार बसने प्रवास करावा लागणार आहे. 

त्यानुसारच प्रवाशांना प्रवास करावा लागणार 

मुंबई, पुणे, नागपूरनंतर वेगाने वाढणाऱ्या शहरांत नाशिकचा क्रमांक लागतो. २०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या पन्नास लाखांपर्यंत पोचेल, असा अंदाज सर्वेक्षणाअंती मांडण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बळकट करण्यासाठी शहर बस वाहतूक सुरू केली जाणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून बससेवा सुरू करण्याचे नियोजन असले तरी पायाभूत सुविधा, शासनाच्या ना हरकत दाखल्याअभावी सेवा लांबण्याची शक्यता आहे. परंतु दुसरीकडे परिवहन समितीच्या वतीने बससेवा सुरू करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. त्यातलाच एक भाग म्हणून मार्गिकांना क्रमांक देण्यात आले असून, त्यानुसारच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. 

अठरा ठिकाणी बस टर्मिनल 

बससेवेसाठी १४६ नवीन मार्ग प्रस्तावित असून, त्यावर नऊ ऑफ रोड, तर आठ ऑन रोड असे एकूण १७ टर्मिनल उभारले जाणार आहेत. यात मखमलाबाद, पेठ रोड, आडगाव, नांदूर गाव-१, बालाजीनगर, भोसला मिलिटरी स्कूल, जेहान सर्कल, गंगापूर रोड, श्रमिकनगर, पिंपळगाव बहुला, एक्‍स-लो, उत्तमनगर, इंदिरानगर, सिटी गार्डन, निमाणी, नाशिक रोड, गंजमाळ येथील टर्मिनलचा समावेश आहे. नाशिक रोड, आडगाव व तपोवन येथे तीन डेपो उभारले जाणार आहेत. १४६ मार्गिकांवर सध्या अस्तित्वात असलेल्या ७१ बस थांब्यांसह नवीन ३०२ बस शेल्टर व ३८९ स्टॅन्डपोस्ट बस थांबे निर्माण केले जातील. 

नाशिक रोड डेपोवरून असा असेल मार्ग 
मार्ग क्रमांक स्थळ 

१०१ बारदान फाटा (श्रमिकनगरमार्गे) 
१०२ बारदान फाटा (कॉलेज रोडमार्गे) 
१०३ सिम्बायोसिस (सीबीएस, उत्तमनगरमार्गे) 
१०४ सिम्बायोसिस (लेखानगरमार्गे) 
१०५ सिम्बायोसिस (औदुंबरनगरमार्गे) 
१०६ पाथर्डी गाव (द्वारका, नागजी, इंदिरानगरमार्गे) 
१०७ पाथर्डी फाटा (महामार्ग, वासननगरमार्गे) 
१०८ अमृतनगर (कमोदनगर, पाथर्डी फाटामार्गे) 
१०९ अंबड गाव (द्वारका, लेखानगरमार्गे) 
११० बोरगड (सीबीएस, मेरी, म्हसरूळमार्गे) 
१११ आरोग्य विद्यापीठ (शालिमारमार्गे) 
११५ तपोवन (जेल रोड, द्वारकामार्गे) 
११६ कसबे-सुकेणे (आडगावमार्गे) 
११८ म्हाडा कॉलनी (भाभानगर, त्रिमूर्ती चौकमार्गे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com