जिल्ह्यात झपाट्याने घटतेय ॲक्‍टिव्‍ह रग्णसंख्या; नव्याने ३४४ कोरोना बाधित

अरुण मलाणी
Friday, 30 October 2020

शुक्रवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १४६, नाशिक ग्रामीणमधील १८२, मालेगावचे १०, जिल्‍हाबाह्य ६ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाच्‍या ॲक्‍टिव्‍ह रूग्णसंख्येत सातत्याने व झपाट्याने घट होत आहे. शुक्रवारी (ता. ३०) दिवभरात ३४४ कोरोना बाधित आढळून आले, तर ६५० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. चार रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांच्या संख्येत ३१० ने घट झाली असून, सद्यस्‍थितीत जिल्ह्यात ४ हजार १३२ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

शुक्रवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १४६, नाशिक ग्रामीणमधील १८२, मालेगावचे १०, जिल्‍हाबाह्य ६ रूग्णांचा समावेश आहे. तर, नाशिक शहरातील १५९, नाशिक ग्रामीणचे ४७१, मालेगावचे पाच व जिल्‍हाबाह्य १५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. चार मृतांपैकी दोन नाशिक महापालिका हद्दीतील, तर दोघे नाशिक ग्रामीणमधील आहेत. यातून जिल्ह्यालील एकूण बाधितांची संख्या ९३ हजार ४४३ झाली असून, यापैकी ८७ हजार ६४४ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ६६७ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालय व गृहविलगीकरणात ४१७, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६१, मालेगाव रूग्‍णालयात आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच तर, जिल्‍हा रूग्‍णालयात नऊ रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ अहवाल प्रलंबित होते, यापैकी ३५८ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील संशयित रूग्‍णांचे आहेत. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active corona patients in the district is rapidly declining nashik marathi news