Corona Updates : जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्या 310 ने घटली; बरे झालेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

अरुण मलाणी
Thursday, 8 October 2020

गुरूवारी नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 394, नाशिक ग्रामीणचे 314, मालेगावचे 24, जिल्हाबाह्य चार बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 492, नाशिक ग्रामीणचे 495, मालेगावचे 39 तर जिल्हाबार्हय बारा रूणांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : जिल्ह्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या सलग एक हजारांच्या आत असतांना, गुरूवारी (ता.8) बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या नवीन कोरोना बाधितांपेक्षा अधिक राहिली. दिवसभरात 736 बाधित आढळले असतांना, कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांची संख्या 1 हजार 038 राहिली. तर आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून अॅक्‍टिव्ह रूग्ण संख्येत 310 ने घट झाली असून, सद्य स्थितीत 8 हजार 979 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

गुरूवारी नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 394, नाशिक ग्रामीणचे 314, मालेगावचे 24, जिल्हाबाह्य चार बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 492, नाशिक ग्रामीणचे 495, मालेगावचे 39 तर जिल्हाबार्हय बारा रूणांनी कोरोनावर मात केली आहे. आठ रूग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी प्रत्येकी चार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातील आहेत.यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 83 हजार 574 झाली असून, यापैकी 73 हजार 111 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 हजार 484 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 8 हजार 979 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका व गृहवलगिकरणात 1 हजार 025, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 120, मालेगाव महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 11, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय 13, जिल्हा रूग्णालयात दहा संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरा 1 हजार 507 अहवाल प्रलंबित असून, यापैकी सर्वाधिक 1 हजार 083 नाशिक ग्रामीण भागातील आहेत.  

 हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients in the district decreased by 310 nashik news